चार-पाच वर्षापासून अनेक कुटुंबांना राशन मिळत नाही
पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून जिल्ह्यातील राशन धारकांना अन्न पुरवठ्याची पूर्तता करून द्यावी
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभागात रेशन कार्ड मिळवण्यासाठी चकरा मारावा लागत असून, अनेक लाभार्थ्यांचे ऑनलाईन मधून आरसी डिटेल्स रद्द केले आहे. तर काही लाभार्थ्यांना चार ते पाच वर्षापासून लाभार्थ्यांना अन्नपुरवठा योजनेच्या लाभ मिळत नसल्याने पुरवठा विभागावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
चार वर्षापासून नागरिकांची रेशनकार्ड वर धान्य कधी मिळेल, याबाबत विचारणा करीत असले तरी संबंधित अधिकाऱ्यांकडून उलट सुलट बोलले जात आहे. हा कितपत योग्य आहे ? रेशन कार्ड धान्य कधी मिळेल ? याची शाश्वती का मिळत नाही ?अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे ऑनलाईन रेशन कार्ड प्रणाली सुरू असली तरी यात नव्या त्रुटी आढळून आली आहे.नव्याने रेशन कार्ड काढलेल्या तसेच नवीन नाव नोंदणी झालेल्या नागरिकांना धान मिळने शक्य का झाले नाही ?असे विचारले असता अन्नपुरवठा विभागाचे कनिष्ठ लिपीक धकाते यांनी उलट सुलट उत्तर देऊन राशन कार्ड लाभार्थ्यांचा मन दुखावला आहे. धकाते यांनी रोजंदारीवर एक मुलगा ठेवला असून ऑनलाइन नोंदणी करिता २०० रुपये घेत असून लाभार्थ्यांची पिळवणूक होत आहे. राशन कार्डच्या नावाखाली राशन मिळवून देतो यांचे पैसे घेतले जात असल्याचे लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे. तरीही तहसील कार्यालयाचे तहसीलदार चुप्पी मारून बसलेले आहेत. हा कितपत योग्य आहे ? नव्याने तयार करण्यात आलेल्या राशन धारकाकडून पैसे घेऊन त्यांना राशन पुरवठा मंजूर करण्यात येत आहे.
तहसीलदार दीपक करांडे यांच्या डोळ्यासमोर अन्नपुरवठा विभागात जो पैसे देईल त्यांच्याच काम करण्यात येत असल्याच्या प्रकार दिसत आहे. तरीपण वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहे ? असा मोठा प्रश्न शासन धारक लाभार्थ्यांना पडला आहे. एखाद्या लाभार्थ्यांना नव्यानं राशन कार्ड बनवायचे असले तर, नियमाने एक महिना लागेल असे बोलून लाभार्थ्यांना हाकलून लावतात. आणि ज्या लाभार्थ्यांनी पैसे दिले तर त्यांना दोन दिवसात राशन कार्ड मिळतो असे भोंगळ कारभार तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात सुरू आहे. अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी धकाते यांच्याकडे गेल्यास ऑनलाईन प्रणाली बंद असल्याचे सांगितले जाते. ऑनलाइन प्रणाली सुरू असली तरीही लाभार्थ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. ऑनलाइन प्रणाली कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आधार कार्ड लिंक केल्यानंतर त्या रेशन कार्डला १२ अंकी आरसी नंबर प्राप्त होतो. त्यानंतर उत्पन्नाच्या अटीवर पात्र कुटुंबांना स्वस्त धान्य मिळतो.मात्र नवीन वर्षापासून त्या प्रणालीत दोष आढळून येत आहे. मोहाडी तालुक्याच्या विचार केल्यास जवळपास ३००० हजार लाभार्थ्यांना अन्न मिळत नाही.
अन्नपुरवठा विभागाकडे अत्यावश्यक कारणासाठी लागणारे रेशन कार्डही उपलब्ध नाही. हे मात्र विशेष आहे. एखाद्या व्यक्तीला अत्यावश्य रेशनकार्ड लागले तर त्यास रेशनकार्ड देण्यासाठी मोहाडी पुरवठा विभागाकडे कोरे रेशनकार्ड उपलब्ध नाही. असे सांगण्यात येते. त्यामुळे संबंधित गरजू लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहू शकतो. नागरिकांचा अंत न बघता प्रत्येक गावातील दक्षता समिती यांनी एकनिष्ठ होऊन गावातील अत्यंत गरजू लाभार्थ्यांना राशन मिळवून देणे हे खास आहे.
अत्यंत गरजू लाभार्थ्यांच्या अंत न बघता संबंधित अधिकारी धकाते व तहसीलदार यांनी रेशन कार्ड त्वरित मिळतील अशी व्यवस्था करावी. व पाच वर्षापासून वंचित असलेले लाभार्थ्यांना त्वरित राशन द्यावे अशी मागणी केली जात आहे. व क्षेत्राचे आमदार साहेब यांनी त्वरित पालकमंत्री देवेंद्र फडवणीस यात लक्ष घालावे असे पत्र लिहून अन्यायग्रस्त राशनकार्डधारकास त्यांचे हक्क मिळवून द्यावे. या करिता देवेंद्र फडवणीस यांनी सुद्धा लक्ष द्यावे. अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे .


0 टिप्पण्या