सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर मो. 86002 70199
सोलापूर :-मिशन आयुर्वेद,महाराष्ट्र राज्य ,सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटना व राष्ट्र संचार यांच्या संयुक्त विद्यमाने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल अकलूज ता.माळशिरस जि.सोलापूर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये डॉ. चंद्रशेखर टेंगळे यांच्या बारामती किंग इलेव्हनने पहिला क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक डॉ.अजित पवार यांच्या बारामती सुपर किंग्स यांना मिळाला तर तृतीय क्रमांक डॉ. विकास स्वामींच्या सोलापूर वॉरियर्सने घेतला.
मालिकेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पुण्याच्या डॉ.अविनाश गावडे ,
बेस्ट कॅच अकलूजच्या डॉ. उदयसिंह जाधव
बेस्ट फिल्डर डॉ.प्रणव कदम
बेस्ट बॅट्समन डॉ.अजित पवार यांना यांनी मिळवला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मा.सौ उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील,पंढरपूरच्या ना.तहसिलदार सौ.शितल हर्षवर्धन गायकवाड,महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचे सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर कार्यवाह सचिनजी शिंदे, भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुक्तार भाई कोरबू ,भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, शिवसेना ठाकरे गट संघटक अॅड. वीरेंद्र वाघमारे, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन माळशिरस तालुका अध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड ,रोटरी क्लब सराटी डिलाईटचे अध्यक्ष सौ. स्वाती चंकेश्वरा, सचिव दिनेश कदम, सोलापूर जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेचे सदस्य डॉ. विठ्ठलराव कवितके ,डॉ.शिवाजीराव काळे ,श्रीकांत औषधी भांडारचे मालक अनिलकुमार वैद्य, आनंदनगरचे मा.उपसरपंच वसंतराव गायकवाड, नितिन दोशी यांच्या शुभ हस्ते विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
प्रमुख पाहुण्या मा. सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांनी व्याधीमुक्त होण्यासाठी मानसिक व शारीरिक आरोग्य तंदुरुस्त असणे गरजेचे असून धकाधकीच्या आयुष्यात व्यायामाची सवय महत्वाची असून त्याच्या जोडीला मैदानी खेळ असेल तर आपोआपच व्यायाम होतो.त्यामुळे प्रत्येकाने खेळाची आवड जोपासली पाहिजे असे सांगत राज्य भरातून क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे कौतुक करत मिशन आयुर्वेद, राष्ट्रसंचार व जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स संघटनेच्या कामाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
तृतीय पारितोषिकसाठी डॉ. उदयसिंह जाधव यांच्या अकलूज वॉरियर्स व डॉ. विकास स्वामींच्या सोलापूर वॉरियर्स यांच्यामध्ये लढत होऊन यामध्ये सोलापूर वॉरियर्सने जिंकला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल बळते, मिशन आयुर्वेदाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन गायकवाड ,सचिव डॉ. नागनाथ दगडे ,सदस्य डॉ.अनिस शेख,डॉ.नितीन कुबेर, डॉ. छाया दगडे,डॉ.फैज सय्यद डॉ.ऋतूमेश कांबळे यांनी मेहनत घेतली.
यावेळी डॉ. अविनाश गावडे (पुणे), डॉ. निरंजन रेवडकर(पुणे), डॉ. प्रशांत माने (बारामती) डॉ. चेतन देवकाते(बारामती) डॉ. चंद्रशेखर ठेंगले(बारामती), डॉ. योगेश पाटील (कोल्हापूर), डॉ.प्रद्मुन सातव (माढा). विकास स्वामी (सोलापूर), डॉ. मिलिंद हिंगमिरे (सोलापूर), डॉ. संग्राम किल्मिसे,मिशन आयुर्वेदचे सचिव डॉ. मधु राव (पुणे), मिशन आयुर्वेद संघटक डॉ. चेतन धायगुडे (शिरवळ), डॉ.उदयसिंह जाधव (अकलूज), डॉ.प्रशांत पाटील (माळशिरस), डॉ.अभिजीत पाटील (वेळापूर), डॉ.तुषार माने (वेळापूर), संजय जगदाळे इ.उपस्थित होते.


0 टिप्पण्या