भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
गोदिया : मा.यशस्वी पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतुन विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्राम विकासाचा हा संकल्प पूर्ण होत आहे. जल जीवन मिशन हे सुध्दा अशाच कल्याणकारी योजनांचा भाग असून घरा घरात मुबलक आणि शुद्ध पाणी पोहचणार असल्याचे सांगितले.
गोंदिया जिल्हा तिरोडा तालुक्यातील मौजा येडमाकोट येथे जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी १३ लाख रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजना.
मेंढा येथे ५७ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजना व प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र ईमारतीचे उद्घाटन या सर्व विकासकामांचे विधिवत भूमिपूजन खासदार मा. सुनील बा. मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र सरकार ग्राम विकासाचे सूत्र हाती घेत पुढे जात आहे. जे काही चांगले आणि कल्याणकारी उपक्रम, योजना राबवित केंद्र सरकार सामन्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे, ते कार्य जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरणारे आहे. लोकांनीही या लोकहिताच्या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन केले. प्रत्येकाला घर, घरात गॅस आणि आता प्यायला शुद्ध पाणी ही निर्धार पूर्णत्वास जात असल्याचा आनंद असल्याचेही यावेळी सांगितले.
याप्रसंगी सर्वश्री विजयभाऊ रहांगडाले आमदार तिरोडा, पंकजभाऊ रहांगडाले जिल्हा परिषद अध्यक्ष भजनदासजी वैद्य माजी आमदार, जगदीशजी बावनथडे जिल्हा परिषद सदस्य, कुंताताई पटले पंचायत समिती सभापती, उपराजजी जमाईवार पंचायत समिती उपसभापती, मदनभाऊ पटले, ओमभाऊ कटरे, संगीताताई सूर्यवंशी सरपंच, विजयजी बिझाडे पंचायत समिती सदस्य, दिपालीताई टेंभेकर पंचायत समिती सदस्य, रामभाऊ ठाकूर माजी सरपंच, स्वातीताई घोडमारे आरोग्य अधिकारी बाळाभाऊ वहिले व समस्त ग्रामवासी उपस्थित होते.


0 टिप्पण्या