Ticker

6/recent/ticker-posts

आलापल्ली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा महिला काँग्रेसच्या वतीने निषेध


दोन्ही आरोपीना कठोर शिक्षा करा - काँग्रेसची मागणी 

प्रतिनिधी चित्रा न्युज
गडचिरोली:: एटापल्ली तालुक्यातील आदिवासी समुदायातील अल्पवयीन मुलगी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी गेली असता आलापल्ली येथे दोन युवकांनी सामूहिक अत्याचार केला याचा गडचिरोली जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात निषेध करण्यात आला सोबतच दोन्ही आरोपीवर कठोर कारवाही  करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली.
गडचिरोली जिल्हा आदिवासी दुर्गम नक्षलग्रस्त असला तरी आजपर्यंत महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण कमी होते मात्र सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात पूर्णतः उदासीन आहे. दिवसागणिक जिल्ह्यातील महिलांच्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे , आता तरी सरकारने आणि प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महिलांच्या सुरक्षा करिता ठोस पावले उचलावी अशी मागणी सुद्धा यावेळी  काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. 
आंदोलनात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेवराव कीरसान, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पौर्णिमा ताई भडके,  काँग्रेस तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, रोजगार सेल कार्याध्यक्ष पुष्पलत्ता कुमरे, आशा मेश्राम,  रेखा तोडसे, बेबी तेलामी, शारदा मडावी, शालिनी उईके, वनिताताराम मालता पुडो, बबीता उसेडी, रजिया उसेंडी, रजनी कुमरे, सुनीता उसेंडी,  विद्या दुगा, सुनिता उसेंडी,  आरती कंगाले, रीता गोवरधन, लीना उंदिरववाडे, वंदना ढोक, वनिता उसेंडी सह इतर महिला आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या