Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांच्या सुखकर जीवनासाठी केंद्र सरकार तत्पर : खासदार सुनील बा. मेंढे


भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

भंडारा :मोहाडी, दिनांक ६ जुन २०२३ दिव्यांगांचे जीवन सुखकर करण्याचा संकल्प घेऊन विविध योजना केंद्र सरकार राबवत आहे. दिव्यांगांना सर्वसामान्यांप्रमाणे जगता यावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून साहित्य वाटपाचे शिबिर घेत आधार देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय आणि एआयडीपी विभागाच्या वतीने दिव्यांगांना साहित्य वाटपाच्या दृष्टीने मूल्यांकन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना मोफत साहित्य वाटप करण्यासाठी मोहाडी तालुक्यात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार सुनील मेंढे पुढे म्हणाले, ग्राम विकासाचा संकल्प घेऊन नऊ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी सरकारने काम सुरू केले. आपल्या संकल्पा  वर पूर्णपणे खरे उतरीत सरकार गरीब कल्याणाचा शब्द पूर्ण करीत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच दिव्यांगांनाही त्यांच्या पायावर उभे होता यावे म्हणून दिव्यांगासाठी साहित्य वाटपाची योजना आणली गेली. देशभरात असंख्य दिव्यांग या योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे होऊ शकले असेही त्यांनी सांगितले. पात्र ठरूनही ज्या लाभार्थ्यांना आज साहित्य मिळाले नसेल अशांना घरपोच साहित्य पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येईल असा विश्वास यावेळी खासदारांनी दिला.
तसेच जनता दरबार कार्यक्रमाचे औचित्त साधुन विविध समस्या घेऊन त्या सोडविल्या जातील या आशेने आलेल्या तालुक्यातील असंख्य नागरिकांचे आज समाधान झाले. मोहाडी तालुक्यातील नागरिकांनी  आयोजित जनता दरबारात अनेक समस्या मांडल्या. जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून महसूल, जिल्हा परिषद, कृषी, वीज वितरण कंपनी, घरकुल, पाणी समस्या अशा विविध विषयांवर आपल्या अडचणी मांडल्या. यातील काही तक्रारी आणि समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून निकाली काढल्या तर काहींच्या दृष्टीने ठराविक कालावधीत त्याचा निपटारा करण्यासाठी सूचना दिल्या. सहज सुटणाऱ्या मात्र सरकारी यंत्रणेच्या कारभाराला बळी पडलेल्या अनेक तक्रारी या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या होत्या. या प्रसंगी प्रामुख्याने सर्वश्रीराजेंद्र जी पटले, भगवानजी चांदेवार तालुकाध्यक्ष, रितेश वासनिक सभापती पं स, छाया डेकाटे नगराध्यक्ष, दिशा निमकर बांधकाम सभापती, सविता साठवणे नगरसेविका, रवी देशमुख, सुवर्णा काटवले महिला अध्यक्ष, यादवराव मुंगमोडे तालुका महामंत्री, निशिकांत इलमे, कैलासजी जंजाळ पं स सदस्य, महेंद्रजी शेंडे जिल्हा परिषद सदस्य, दीपक करंडे तहसीलदार, दुर्गाताई बुराडे पंचायत समिती सदस्य, भोजराम जी पारधी मा  सभापती, पल्लवी वाडेकर बिडीओ , भीमराव गोपाळे, मनोज सुखानी शक्ति केंद्रप्रमुख ,ज्योतिष नंदनवार नगरसेवक, नरेंद्र निमकर महासचिव, राजेंद्र शेंडे महामंत्री, रविकांत देशमुख शहर अध्यक्ष, मंगेश पारधी युवा मोर्चा अध्यक्ष, निलेश माहूरकर महामंत्री युवा मोर्चा, पुल्लीवार साहेब पीएसआय  मोहाडी, अभिजीत पाटील उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या