राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विस्तारीत कार्यकारिणी बैठक संपन्न
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847
भंडारा : दि. १२/६/२०२३ रोज सोमवारला भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीची बैठक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यालय, तिलक वार्ड, भंडारा येथे घेण्यात आली. श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी खासदार मा. श्री. प्रफुलभाई पटेल व खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांची निवड झाल्याबद्दल भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्ष कार्यालयासमोर आतिषबाजी करुन आनंद साजरा करण्यात आला.जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष श्री. नाना पंचबुद्धे,प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, प्रदेश महासचिव श्री.जयंत वैरागडे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सरीताताई मदनकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. आगामी लोकसभा,विधानसभा,व नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हयातील प्रत्येक गावात व वार्डात बूथ कमेटी स्थापन करण्याची जबाबदारी सर्व सेलचे अध्यक्ष व बूथ कमेटी अध्यक्ष यांनी घ्यावी. पक्षाचे ध्येय धोरण जनसामान्यांपर्यत पोहचविण्यासाठी बूथ कमेटी आवश्यक आहे. निवडणुकीचे संचालन हे बूथ कमिटीच्या माध्यमातून होत असते त्यामुळे नव्याने बूथ कमेटी स्थापन करुन पक्ष संघटन मजबूत करावे व सभासद नोंदणी तात्काळ पुर्ण करावी अशी सुचना जिल्हाध्यक्ष श्री. नाना पंचबुध्दे यांनी केली. त्याकरीता गावागावात बूथ कमेटी स्थापन करावी. सोबतच महिला व युवकांची बूथ कमेटी स्थापन करुन पक्ष वाढीकरीता प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबवावा असे प्रतिपादन प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल यांनी केले. यावेळी पक्ष संघटनेबाबत सर्व विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष / शहर सर्व सेलचे अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये सौ. रिता हलमारे, श्री. यशवंत सोनकुसरे, डॉ. रविंद्र वानखेडे, अॅड. विनयमोहन पशिने, श्री. अविनाश ब्राम्हणकर, सौ. रत्नमाला चेटूले, श्री. हेमंत महाकाळकर, श्री. नरेंद्र झंझाड, श्री. धनेंद्र तुरकर, श्री. रजनिश बन्सोड, श्री.राहुल निर्वाण, सौ.मंजुषा बुरडे, श्री.महादेव पचघरे, श्री.योगेश हेडाऊ, श्री. शेखर गभने, श्री. देवचंद ठाकरे, श्री. मनोज वासनिक, बालुभाऊ चुन्ने, सौ. पमाताई ठाकुर, अॅड. नेहा शेंडे, सौ. किर्ती गणविर, श्री. विजय सावरबांधे, श्री. विजय पारधी, श्री. वासुदेव बाते, श्री. अरुण अंबादे, श्री. सदाशिव देंगे, दयानंद नखाते, उमेश ठाकरे, सुनिल साखरकर, अमन मेश्राम, रवि लक्षणे, सुनिल शहारे, परमेश्वर नलगोपुलवार, लोकेश नगरे, धनु व्यास, नागेश वाघाये, नरेश इलमकर, नागेश भगत, सौ. रेखाताई ठाकरे, सौ. संगीता चौहान ,आनंद मलेवार, राजुजी सोयाम, चंद्रकांत पुंडे, देवराव बोंदरे, दिनेश धोटे, राजेश वासनिक, अरुण गोंडाणे, बादल सुखदेवे, सुमित वाघमारे सौ. प्रमिला लंजे, सौ. कल्पना जाधव, प्रिती शेंडे, शैलेश गजभिये, राजेश शिवरकर, लक्ष्मण झंझाड, पंकेश काळे, संजय वरगंटीवार, लोकेश खोब्रागडे, किरण वाघमारे, रुपेश खवास, वामन शेंडे, जनराज मस्के, राजु सलाम पटेल, विक्की रावलानी, सौ.आशा डोरले, सौ. अर्चना ढेंगे, अंगराज समरीत, ठाकचंद्र मुंगुसमारे, नंदुभाऊ समरीत, जुमाला बोरकर, सौ. हर्षा वैद्य, प्रभू फेंडर, होमराज वरठे, शालिक कागदे, विकेश मेश्राम, रुपेश खवास, विष्णु भोयर, हैशोक शरणागत, प्रणित वैरागडे, सोनु कनोजे, शाहरुख ताहीर शेख, निकेश पंचबुध्दे, चंद्रसेन बन्सोड, रणधीर नेमा, सचिन बरमे, सुभाष दिवठे, ओमप्रकाश चव्हाण, प्रभाकर बोदेले, संजय बोंदरे, राजेश डोरले, प्रीत वालकर, प्रदीप सुखदेवे यादव भोगे, शमीर खान, किशोर बुक्कावन, हरीष तलमले, अश्विन बांगडकर, वेद साऊलकर, खुशाल शिवरकर, फरहान पटेल, श्रीमती किर्ती कुंभरे, श्रीमती मनिषा गायधने, सौ. सोनु तरारे, ज्योती चिंधालोरे, चेतन माकडे, चेतन बांडेबुचे, जयशिला, भुरे, प्रिती गजभिये, लता मेश्राम, शकील, सुभाष तितीरमारे, मोहित पाटेकर, सोमेश्वर भुरे, बंडु चेटूले, संजय सतदेवे, नागेश वाघाये, पुण्यशिला कांबळे, राजु खोब्रागडे, रामेश्वर राघोर्ते, कु. सिध्दी वैद्य, काव्यांजली वैद्य, रामदास बडवाईक, चंद्रकुमार सेलोकर, महादेव फुसे, प्रशांत मेश्राम, जितेंद्र बोंद्रे, सौ. विद्या साखरे, सौ. निशा राऊत व फार मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.*


0 टिप्पण्या