प्रतिनिधी चित्रा न्युज
कोल्हापूर - वंचित बहुजन युवा आघाडी करवीर तालुक्याच्यावतीने भव्य युवा मेळावा आयोजित करण्यात आला. या युवा मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक सोमनाथ साळुंखे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तसेच प्रमुख उपस्थिती इतर मान्यवर उपस्थित होते. "करू जयंती आदर्श भीमाची'' ह्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुक्यामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण या ठिकाणी करण्यात आले होते.
यामध्ये प्रमुख मार्गदर्शक सोमनाथ साळुंखे यांनी राज्याची धुरा व देशाची धुरा युवकांच्या हातामध्ये आली पाहिजे. तसेच युवकांचे मोठे संघटन बांधण्याकरिता एकत्र आले पाहिजे. या देशाची वाटचाल नक्कीच हुकूमशाहीकडे आहे त्यामुळे सर्वांनी सावध होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सोमनाथ साळुंखे यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुका मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक विविध मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना देऊन सन्मानित करण्यात आले. या मेळाव्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन कांबळे कुर्डूकर यांनी आजपासून जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे सभासद नोंदणी अभियानास सुरुवात करत 2024 मध्ये तालुका आणि पंचायत समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी ला यश मिळेल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी क्रांतीताई सावंत, आफरोज मुल्ला, यांनी सध्या बाळासाहेब आंबेडकर हे प्रस्थापितांच्या छाताडावर बसून सत्ता स्थापन व हात बळकट करण्यासाठी आपल्याला लढावे लागेल. असे सांगण्यात आले. यावेळी संजय गुदगे ,भीमराव गोंधळी, प्रवीण बनसोडे, अमित नागटिळे ,दीपक कांबळे, डॉ. आकाश कांबळे करवीर तालुका कार्यकारणी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या