• मानेगाव/सडक येथील प्रकार
• नियमबाह्य अकृषक आदेश पारित, नोंदणी करणे आले अंगल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा:-लाखनी येथील भूमाफिया मोटघरे दाम्पत्य यांनी तत्कालीन तहसीलदार व दुय्यम निबंधकाशी संघटित गुन्हेगारी प्रवृत्तीचे कृत्य करून नियमबाह्य अकृषक आदेश पारित करून नोंदणी केल्याने शासन व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन तहसीलदाराचे नाव आर.जी. शक्करवार व दुय्यम निबंधकाची नावे दिनेश विष्णू कुंभलकर, उदाराम सूर्यभान ढोमने अशी आहेत. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
भूमाफीया अरुण माधोराव मोटघरे, शारदा अरुण मोटघरे यांच्या संयुक्त मालकीची असलेली मौजा मानेगाव/सडक, तालुका लाखनी येथील गट क्रमांक २८७/१आराजी ०.७८.५० हेक्टर आर शेतजमिनीचे निवासी प्रयोजनार्थ अकृषक करतांना ऑक्टोबर २०१७ मध्ये नियमबाह्य अकृषक आदेश पारित केला होता. त्यात एकूण क्षेत्रफळाच्या ५१ चौरस मीटर जास्त जागेचा बेकायदेशीर व नियमबाह्य अकृषक आदेश पारित करून शासन व जनतेची फसवणूक केली होती. या जागेचे भूमी अभिलेख कार्यालयाकडून ३२ प्लॉट चे ११ ऑगस्ट २०१७ रोजी डीमार्गेशन करून घेतले. त्यानुसार ३२ प्लॉट या व्यतिरिक्त ओपन स्पेस ७९० चौरस मीटर आणि रस्त्याची जागा १२५१.९८ चौरस मीटर असल्याचे नियमानुसार वर्गीकरण केले होते. याची क प्रत व ५ प्रतीत ले-आऊट नकाशा भूमाफियाने तहसील कार्यालयात सदर केल्याचा देखावा निर्माण करून तत्कालीन तहसीलदार आर.जी. शक्करवार यांचेशी संगनमत करून नगररचनाकार भंडारा यांना १७ ऑगस्ट २०१७ रोजी अंतिम मंजुरी चे शिफारस पत्र पाठविले. मात्र भूमाफिया ने याच जागेचे २८ जुलै २०१७ रोजी नगररचना कार्यालयास अंतिम मंजुरी चे दुसरे बनावट शिफारस पत्र तयार करून ३६ प्लॉट चा ले-आऊट नकाशा तयार केला व लाखनी तहसील कार्यालयाकडून ५ ऑक्टोबर २०१७ रोजी अकृषक आदेश पारित करून घेतला.
भूमाफिया मोटघरे दाम्पत्याने नगररचना कार्यालयाचे बनावट अंतिम शिफारस पत्र व ले-आऊट नकाशा व नगर रचना कार्यालयाचे शासकीय शिक्के लाऊन संबंधित अधिकाऱ्याची बनावर स्वाक्षरी करून ७/१२ मधील क्षेत्रफळापेक्षा ५१ चौरस मीटर ने जास्त झाले. भूमाफिया ने प्लॉट धारकांना रजिस्ट्री करून देताना दुसरा बनावट नकाशा तयार केला. त्यामध्ये मंजूर आदेशाप्रमाणे सार्वजनिक प्रयोजनार्थ राखून ठेवलेली जागा पूर्णतः नष्ट केली व सदर नकाशावर सुद्धा नगररचना कार्यालयाचे बनावट शिकके लावल्याने लाखनी पोलिसांत अपराध क्रमांक ०५/२०२३ कलम ४०९, ४१८, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७३, १२०(ब), ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत असून पोलीस हवालदार सुभाष राठोड सहकार्य करीत आहेत.
असे फुटले बिंग
भूमाफिया मोटघरे दाम्पत्याने लोकांना रजिस्ट्री करून देताना बनावट नकाशाच्या आधारे सार्वजनिक उपयोगात येणारी ७९२ चौरस मीटर जागा पूर्णतः नष्ट करून नगररचना कार्यालयाचे बनावट शीक्के लावून "रीकमांडेड फॉर डीमॉर्गेशन" असे लिहिले. पण नगररचना कार्यालय "रीकमांडेड फॉर ॲप्रुवल फॉर रेसिडेंटल पर्पज" असे लिहिणे अनिवार्य असल्यामुळे बिग फुटले.
आता पर्यंत गुन्हे दाखल झालेल्याची नावे अशी आहेत
भूमाफिया अरूण माधोराव मोटघरे, शारदा अरूण मोटघरे, ऋषभ अरूण मोटघरे, मुनाफ आबिद शेख, अजहर जफर शेख, जफर मजहर शेख सर्व राहणार लाखनी. मोहताब नवशाद शेख पालांदूर, शेतकरी ओमशंकर चेटूले रा. केसलवाडा/वाघ, दिलीप चोले सावरी, नगररचना कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक रुशाली अनिल बारई, कनिष्ठ लिपीक अशोक हटवार, नगररचनाकार मिलिंद श्रीपतराम नेवारे, तत्कालीन तहसीलदार आर.जी. शक्करवार, दुय्यम निबंधक दिनेश कुंभलकर, उदाराम ढोमने अशी गुन्हा दखल झालेल्यांची नावे आहेत.


0 टिप्पण्या