Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞



💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - २३ जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २ आषाढ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   आषाढ 
पक्ष :    शुक्ल              
तिथी :  पंचमी (१९.५०) ~ षष्ठी                                                   
वार :    शुक्रवार
नक्षत्र :   मघा             
राशी :    सिंह

*स्कंद पंचमी*

वल्लभाचार्य पुण्यतिथी 
संत चूडामणी महाराज प्रकट दिन, देगलूर, नांदेड 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन
आंतरराष्ट्रीय विधवा दिन
संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिन

१७५७: प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या ३,००० सैन्याने सिराज उद्दौलाच्या ५०,००० सैन्याचा फितुरी घडवून पराभव केला.
१८६८: क्रिस्टोफर लॅथम शॉल्स यांना टाईप-राइटर च्या शोधासाठी पेटंट मिळाले.
१८९४: पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना झाली.
१९२७: भारतीय नभोवाणी मुंबई येथे सुरु.
१९६०: अमेरिका आणि जापानमध्ये सुरक्षेसंबंधी समझोता करण्यात आला.
१९६९: आय.बी.एम. ने जाहीर केले की जानेवारी १९९७ पासून सॉफ्टवेअर आणि इतर सेवांची किंमत वेगवेगळी होईल त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरु झाला.
१९८५: दहशतवादी बॉम्बचा एअर इंडियाच्या कनिष्क बोइंग ७४७ विमानात स्फोट. ३२९ ठार.
१९९६: आवामी लीगच्या शेख हसीना वाजेद यांचा बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला. या बांगलादेशच्या दुसर्‍या महिला पंतप्रधान होत.
१९९८: दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली ’यू. एस. एस. मिसुरी’ ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
२०१६: युनायटेड किंग्डम ने ५२% ते ४८% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.

जन्मदिवस 
१९०१: क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी
१९०६: नेपाळचे राजे वीर विक्रम शाह त्रिभुवन
१९४२: सिनेदिग्दर्शक जब्बार पटेल 
१९८०: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू रामनरेश सरवण

मृत्यूदिन 
१७६१: बाळाजी बाजीराव तथा श्रीमंत नानासाहेब पेशवे 
१९१४: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनोद ठाकूर
१९५३: केंद्रीय मंत्री, भारतीय जनसंघाचे (सध्याचे नाव भाजपा) संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी. 
१९७५: जनरल प्राणनाथ थापर, भारताचे भूसेनाप्रमुख
१९८०: संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन. 
१९८०: भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न व्ही. व्ही. गिरी
१९८२: बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांना ऑर्गनची साथ करणारे गंधर्व नाटकमंडळीतील नामवंत कलाकार हरिभाऊ देशपांडे 
१९९०: चरित्र अभिनेते हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय 
२००५: साहित्यिक डॉ. हे. वि. इनामदार

*।। दास-वाणी ।।* 

येक म्हणती देव ब्राह्मण । 
त्यांचें करावें पूजन । 
मायेबाप नारायेण । 
विश्वजनाचा  ।। 

येक म्हणती सांडा गोठी । 
वायांचि करता चाउटी । 
सर्वांस कारण   पोटीं । 
भूतदया असावी  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०८/१०/११-१४ 

मोक्षप्राप्ती कशी होईल याविषयी असंख्य मतमतांतरे आहेत. प्रामाणिक प्रपंचसुद्धा पुरेल इथपासून  संन्यास घ्यावा, साधना करावी,वडिलधाऱ्या मंडळींची फक्त सेवा, भाव म्हणजे श्रद्धा हाच देव इत्यादी.
 
कोणी म्हणतो देवा ब्राह्मणांचे नित्य पूजन करावे. तेच आपले मायबाप. विश्वाचा जनिता पोशिंदा असलेल्या नारायणाची नित्यपूजा मोक्षदायक ठरेल. तर कोणी म्हणेल या सर्व भाकड गोष्टी आहेत. उगीचच केल्या जाणाऱ्या बडबडी थांबवा. फक्त सर्व प्राणीमात्रांविषयी भूतदया दाखवा. भगवंत तुम्हाला तिथेच भेटेल.
जे जे भेटिजे भूत । ते ते मानिजे भगवंत । 
ऐसा जाणिजे निश्चित । भक्तियोगू 
माझा ।। 

शून्यत्वनिरसन समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या