Ticker

6/recent/ticker-posts

जीवनात लक्ष प्राप्तीसाठी कठोर परिश्रम गरजेचे - पोलीस अधिक्षक मा. लोहीत मतानी


भवन लिल्हारे उपसंपादक चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य मो. नं.9373472847

भंडारा : आपले लक्ष साध्य करायचे असेल तर कठोर परिश्रम घेतल्याशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक व मोबाइलवर कमीत कमी वेळ घालवावा, असा सल्ला जिल्हा पोलिस अधीक्षक लोहीत मतानी यांनी दिला.
 जांभोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे उद्घाटन पोलिस आदर्श गाव जांभोरा येथे करण्यात आले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला लोहीत मतानी यांच्यासह अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अशोक बागुल, पंचायत समिती सदस्य प्रिती शेंडे, सरपंच वनिता राऊत, उपसरपंच यादोराव मुंगमोडे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी नवनियुक्त पोलिस पाटील तथा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी करडी पोलिसांनी अभ्यासिकेला पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी करडीचे पोलिस निरीक्षक राजेन्द्र गायकवाड, बीट जमादार प्रफुल वालदे, वैभव काळे, मालाधरे, नंदेश्वर, पोलिस पाटील मुकेश फुलेयांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या