Ticker

6/recent/ticker-posts

मौजा टेमनी येथे रस्त्याचे भूमिपूजन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष - नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते


भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो. नं.9373472847

भंडारा : भंडारा जिल्हा तुमसर तालुक्यातील मौजा टेमनी येथे ५०५४ अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते आज ४ जून रोजी संपन्न झाले. यावेळी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. गंगाधर जिभकाटे, मा. श्री. मोहन पंचभाई जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी, मा.श्री. रमेशभाऊ पारधी सभापती शिक्षण व आरोग्य जि.प. भंडारा, आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
आज नाना पटोले यांचा वाढदिवसही होता. घनश्याम कुंबरे सरपंच ( ग्रा.प. टेमनी ) उपसरपंच वामन तुरकर व ग्रा.पं. सदस्यांनी संपूर्ण ग्रामस्थांकडून नाना पटोले यांना वाढदिवशाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या वेळी आर.टी. बांन्ते सचिव ग्रा.पं. टेमनी, धनराज भगत , मंगेश ठाकूर, रामदास भगत, शिशुपाल भगत, भीमा कामथे, भोजराज तुरकर, सोनू लांजे, केशव भगत, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या