Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - १३ जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. २३ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   ज्येष्ठ
पक्ष :    कृष्ण             
तिथी :  दशमी (०९.३०) ~ एकादशी                                          
वार :  मंगळवार
नक्षत्र : रेवती (१३.३०) ~  अश्विनी     
राशी :   मीन (१३.३०) ~ मेष 

*भौमाश्विनी*
*अमृत सिद्धी योग*

२०००:स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.
१९९७:दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्यूमुखी पडले तर सुमारे १०० जण जखमी झाले.
१९८३:पायोनिअर-१० हे मानवविरहित अंतराळयान नेपच्यूनची कक्षा ओलांडून आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जाणारे पहिले यान ठरले.
१९४३: नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीवरून टोकियो येथे पोहचले.
१९३४: अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस येथे भेट झाली.
१८८६: कॅनडातील व्हॅनकूवर शहर आगीत बेचिराख.

जन्मदिवस :
१९९४: पद्मश्री पुरस्कार व अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय तिरंदाज खेळाडू दीपिका कुमारी 
१९८८: प्रख्यात जागतिक अजिंक्यपद स्पर्धा पदक विजेता पहिली भारतीय आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पटू महिला श्वेता राठोर. 
१९४४: कोरियन राजकारणी व मुत्सद्दी तसंच, संयुक्त राष्ट्राचे माजी सरचिटणीस बान की मून 
१९२३:प्रेम धवन – गीतकार, पद्मश्री
१९०९: केरळचे पूर्व मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते इ. एम. एस. नंबूद्रीपाद 
१९०५:कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. 
१८७९:गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक 
१८३१:जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ 

मृत्यूदिन:
२०१२:’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक 
१९८०: दादू इंदुरीकर, वगसम्राट.
१९६९:प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे –केशव कुमार - लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, , चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते 
१९६७:विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे, पद्मश्री.

*।। दास-वाणी ।।* 

एवं न करितां भगवद्भजन । 
अंतीं नव्हिजे पावन । 
जरी आलें बरें मरण । 
तरी भक्तीविण अधोगती  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
    दासबोध : ०७/१०/२३ 

जिवंतपणी कधी देव आठवला नाही.
प्रपंचामधेच मशगुल राहिला.
भोग भोगताना मजा वाटत होती.
आता मेल्यानंतर मात्र मुक्तीची अपेक्षा.
हे कसे शक्य आहे ?
करावे तसे भरावे हाच न्याय आहे.
आयुष्य भगवंताच्या भजनाशिवाय घालवले. मरणानंतर पापांचा नाश आणि पुण्यप्राप्ती आपोआप होईल काय ?
जरी अगदी उत्तरायण, शुक्लपक्ष, दिवसा, घरामधध्येच सर्व नातलगांच्या उपस्थितीमधे सुखेनैव मरण आले,
सामान्यांच्या कल्पनेप्रमाणे अगदी उत्तम मृत्यू आला. तरीही पूर्वायुष्यात भक्ती केलेली नसेल तर अधोगती निश्चितच मानावी. देहान्तानंतरही जीवाला पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूचे फेरे चुकणार नाहीत हे नक्की. 

देहान्तनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या