सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर - जामखेड येथील अल्पवयीन विद्यार्थी मुलीवर नराधम शिक्षकाने केलेला अत्याचार समाजात काळीमा फासणारा असून त्याचा निषेध जामखेड येथील सर्व समाजाने तहसील कार्यालयासमोर करून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच आष्टी येथील हॉटेल व लॉजमालकाचे लायसन्स रद्द करून याप्रकरणात सहआरोपी करावे अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना शुक्रवारी देण्यात आले.
अल्पवयीन विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून अत्याचार प्रकरणी जामखेड येथील सर्वधर्मीय नागरिकांनी मोठय़ा संख्येने तहसील कार्यालयासमोर एकत्र येऊन घडलेल्या घटनेचा निषेध केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी शिक्षक राधे उर्फ राधाकिसन जगन्नाथ मुरुमकर (रा. साकत) याने शाळेच्या माध्यमातून व अभ्यासाच्या माध्यमातून सोशल मिडिया द्वारे अल्पवयीन मुलीचे अर्धनग्न फोटो मागवून ब्लॅकमेल करून तीस मौजे आष्टी हद्दीतील हर्षद हॉटेल येथे घेवून जावून बळजबरीने बलात्कार केला व सदर प्रकार कोणास सांगितला तर जीवे मारू अशी धमकी दिली याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
सदर प्रकार अतिशय निंदनीय असून तसेच ज्या ठिकाणी हा प्रकार घडला ते आष्टी तालुक्यातील हॉटेल हर्षद अथवा हॉटेल हर्षदचे मालक यांनी ज्या अल्पवयीन मुलीचे कोणतेही आधार कार्ड अथवा कोणतेही वयाचा प्रमाणपत्र न घेता आरोपीशी संगनमत करून रूम देवून गुन्हा केलेला आहे. त्यास देखील सह आरोपी ह्या गुन्ह्यात करण्यात यावे व त्याच्या लोजिंगचे लायसन्स रद्द करण्यात यावे व पुन्हा या प्रकारचे गुन्हे होणार नाही याची दखल घ्यावी.
तसेच शिक्षक यांची पूर्व चौकशी व चरित्र पडताळणी केल्याशिवाय नोकरीस ठेवू नये. या प्रकारचा गुन्हा परत घडणार नाही तसेच कोणत्याही लेकीस व विद्यार्थिनीं बळी पडू नये करिता आम्ही सर्व जामखेड ग्रामस्थ या नराधमास जास्तीत जास्त शासन व्हावे व शिक्षा व्हावी तसेच हॉटेल हर्षद यांचे लॉज परवाना रद्द करण्याचे मागणी करत असून हॉटेल हर्षदचे मालक यांना गुन्ह्यात सह आरोपी म्हणून गोवण्यात यावे असे निवेदन नायब तहसीलदार गणेश भोसेकर व पोलीस निरिक्षक महेश पाटील यांना देवून झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला.
यावेळी वसीम कुरेशी, सय्यद जमीर, ऊमर कुरेशी, शिवसेना तालुका प्रमुख प्रा .कैलास माने ;बापूसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले , माजी नगरसेवक अमित जाधव, दिगांबर चव्हाण, कुंडल राळेभात, समीर पठाण ;विकी घायतडक ;शेख जुबेर, कॅ. लक्ष्मण भोरे, आर्शद शेख, अतिक शेख, वसीम सय्यद, सद्दाम तांबोळी, तौसिफ पठाण, मजहर खान, अशपाक सय्यद, अरबाज शेख, दादा घायतडक, किशोर कांबळे, मिलिंद भोसले आदी नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा कैलास माने ; समीर पठाण ; कुडंल राळेभात ; विकी सदाफुले ; उमर कुरेशी ; विकी घायतडक, कॉ लक्ष्मण भोरे ; दिगांबर चव्हाण ; नय्युम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच नायब तहसीलदार गणेश भोसेकर व पोलीस निरिक्षक महेश पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .
(फोटो - अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी सर्वधर्मीय ग्रामस्थांनी निषेध करून हॉटेल मालकाला सहआरोपी करण्याची मागणी तहसीलदारकडे करून निवेदन दिले)


0 टिप्पण्या