तर देवगड, कणकवली, वैभववाडी,कुडाळ एस.टींसाठी डेपोमध्ये वाहनतळ
खासगी वाहनांसाठी हॉलीबॉल मैदान आणि गवळदेव शेजारील खासगी मैदान
सिंधुदुर्गनगरी:-उद्या कुडाळ येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना घेवून येणाऱ्या मालवण,वेंगुर्ला,सावंतवाडी,दोडामार्ग तालुक्यातील एस.टी. वाहनांसाठी कुडाळ येथील क्रीडा संकुल मैदानात वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. देवगड, कणकवली, वैभववाडी,कुडाळ तालुक्यातून येणाऱ्या एस.टी. वाहनांसाठी एस.टी.डेपो येथे तसेच खासगी वाहनांसाठी क्रीडा संकुल शेजारील हॉली बॉल मैदान आणि गवळदेव शेजारील खासगी मैदानात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून येणाऱ्या एस.टी. तसेच खासगी वाहने यांनी याच ठिकाणी आपली वाहने लावून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा शुभारंभ उद्या कुडाळ येथे होत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध गावातून लाभार्थ्यांना आणण्यासाठी एस.टी. बसेसची सुविधा करण्यात आली आहे. या बसेसमध्ये लाभार्थ्यांसाठी पाणी, नाश्ता, प्रथोमोपचार सुविधा करण्यात आली आहे. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी देखील पाणी, ओआरएस आणि जेवणाची सोय जागेवरच करण्यात आली आहे. त्याचबरोबरच लाभार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य शिबीराची सोय करण्यात आली आहे.
कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून 335 जणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मछिंद्र सुकटे यांनी कार्यक्रम स्थळी व वाहतळाच्या ठिकाणी भेट देवून पूर्वतयारीची पाहणी केली.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे. लाभार्थ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडावा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


0 टिप्पण्या