Ticker

6/recent/ticker-posts

विवाहितेवर तीन सख्या भावांनी केला सामुहीक अत्याचार,,,,,,,,,,,


पैठण तालुक्यातील पारुंडी येथील घटना..........

पाचोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल.........

गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद
मो.8308128457,

औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील  २२ वर्षीय विवाहीत महिला शेतात सरपन आणण्यासाठी गेली असता तीला एकटी पाहुन तीघा सख्या भावांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना दि.२०/६/२०२३ मंगळवार रोजी दुपारी घडली.पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन दि.२२/६/२०२३ गुरुवार रोजी रात्री पाचोड पालीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.नितीन बाबासाहेब निसर्गे,संजय बाबासाहेब निसर्गे,विजय बाबासाहेब निसर्गे सर्व रा.पारुंडी अशी आरोपींचे नावे आहेत.पिडीत महिला मंगळवारी दुपारी शेतामध्ये बांधावर आसलेले मोसंबीच्या झाडाचे सरपन आणण्यासाठी गेली होती. यावेळी जवळच उभे आसलेल्या त्या तिघा सख्या भावांनी एकटी आसल्याचे पाहुन तिच्यावर आळीपाळीने आत्याचार केला.हि घटना कोनास सांगीतल्यावर तुझ्या नवर्‍याला जिवंत मारु अशी धमकीदेखील दिली.तीने घडलेला प्रकार पती व सासुला सांगीतला. आपली समाजात बदनामी होईल म्हणुन त्यांनी दोन दिवस तक्रार दाखल करण्याचे टाळले.मात्र दि.२२/६/२०२३ जुन रोजी सायंकाळी तिघा भावा विरुध्द अखेर पिडीतेने पाचोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या प्रकरणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष माने,महिला दक्षता व भरोसा शेलच्या सहाय्यक पोलीस निरिक्षच जनाबाई सांगळे यांनी 'इन कॅमेरा' महिलेचा जवाब नोंदवुन तिघा सख्या भावा विरुध्द रात्री उशीरा बलात्काराचा गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तीन्ही आरोपी फरार झाले.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष माने,सहाय्यक पोलीस निरिक्षक जनाबाई सांगळे हे करत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या