मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद :- दिनांक 7 जून नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावातील बौद्ध समाजातील अक्षय भालेराव यांच्या हत्या प्रखरणाचा नळदुर्ग ता.तुळजापूर येथे विविध पक्ष ,संस्था संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असून या घटनेतील आरोपींना फासीची शिक्षा द्यावी असी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नळदुर्ग पोलीस ठाणे मार्फत लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या बाबत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे स.पो.उ.नि.पवनकुमार अंधारे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याना देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात पहिल्यांदाच महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून दि.२ जून २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वा.दरम्यान बोंढार हवेली गावातील काही जातीय वादी गाव गुंडानी बौद्ध समाजातील अक्षय भालेराव यांच्यासी भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात निष्पाप बौध्द तरूण अक्षय भालेराव याचा मृत्यू झाला.
सदर ही निंदनीय घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या घटनेचा रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले),व़ंचित बहुजन आघाडी,भटक्या विमुक्त व आदिवासी पारधी समाज संघटना,परिवर्तन सामाजिक संस्था, ओबीसी संघटना,सह विविध पक्ष व संस्था संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून या घटनेतील आरोपीना फासीची शिक्षा द्यावी असी मागणी करण्यात येत आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवनकुमार अंधारे यांनी हे निवेदन स्विकारले असून या निवेदनावर रिपाइं(आठवले) चे जिल्हा समन्वयक एस.के.गायकवाड,अरूण लोखंडे,परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव तथा वंचित बाहुजन आघाडीचे माजी जिल्हा अध्यक्ष,मारूती बनसोडे,ओबीसी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा.काशिराया कलकोटे,भटक्या विमुक्त पारधी समाज संघटनेचे पंडित भोसले,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव आर.एस.गायकवाड,जिल्हा युवा प्रवक्ते गोविंद भंडारे, जेष्ठ कार्यकर्ते कैलास गवळी गुरुजी,व़ंचित बहुजन आघाडीचे अंकुल वाघमारे,अशिष लोंढे, परमेश्वर लोखंडे,अशोक कांबळे, राम गवळी, दिनकर गवळी,अनिल चौबदुले,अंगद लोखंडे, राजेश लोखंडे, मल्लिनाथ माने,राजेंद्र गुरव,हरीलाल लोंढे सह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.


0 टिप्पण्या