Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞


💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - ७ जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. १७ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   ज्येष्ठ
पक्ष :    कृष्ण             
तिथी :  चतुर्थी (२१.५०) ~ पंचमी                                         
वार :    बुधवार
नक्षत्र : उत्तराषाढा (२१.००) ~ श्रवण  
राशी :  मकर 

*संकष्ट चतुर्थी* (चंद्रोदय रात्री १०.४०)

*जागतिक अन्न सुरक्षा दिवस*

१५३९: बक्सरजवळ चौसा येथे अफगाण शासक शेरशाह सुरी आणि मुघल शासक हुमायू यांच्यात झालेल्या लढाईत हुमायूचा पराभव झाला.
१८९३: महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.
१९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.
१९६५: अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
१९७५: क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.
१९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.
१९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.
१९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
१९९१: फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
१९९४:आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
२००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेअरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला बहुमत.
२००४: शिरोमणी अकाली दल (लोंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.
२००६: अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.

*जन्मदिवस* 
१९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष 
१९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास 
१९४२: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी
१९७४: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती 
१९७५: पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट व टेलीव्हिजन मालिका निर्माती आणि दिग्दर्शिका एकता कपूर 
१९८१: मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव 

*मृत्यूदिन* 
१९९२: मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे 
१९९८: शशिकांत नार्वेकर, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष.
२०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर 
२००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती 
२०२०: कन्नड चित्रपट अभिनेते चिरंजीवी सर्जा 

*।। दास-वाणी ।।* 

ब्रह्म ब्रह्मांडी कालविलें । 
पदार्थासी व्यापून ठेलें । 
सर्वांमधे विस्तारिलें । 
अंशमात्रें  ।। 

ब्रह्मामधें सृष्टी भासे । 
सृष्टीमधें ब्रह्म असे । 
अनुभव घेतां आभासे । 
अंशमात्रे  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०४/१५-१६ 

सूक्ष्मतम असलेले परब्रह्म ब्रह्मांडामधे मिश्रित आहे. प्रत्येक दृश्य  पदार्थाला ते व्यापून आहे. पदार्थाचा जेवढा , विस्तार तेवढेच अंशरूप परब्रह्म
त्या त्या पदार्थामधे विस्तारले आहे.

सर्वव्यापी परब्रह्मामधे मर्यादित व्यापकता असलेली सृष्टी आपल्याला भासते. या चराचर सृष्टीमधेही परब्रह्म व्यापूनच आहे.
मात्र ते सत् चित् आनंदरूप जाणून घेण्यासाठी प्रत्येकाची बौद्धिक आणि साधनेची पातळी वेगवेगळी असल्याने तीन स्तरांवर ते जाणले जाते.
सत् ब्रह्म अस्तिरूपात,
चित् ब्रह्म चिदाभासरूपात वैचारिक पातळीवर,
तर आनंदब्रह्म फक्त ब्रह्मज्ञानी अनुभवतात. हेच ते विमलब्रह्म होय.

विमलब्रह्मनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या