Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेतीची वाहूतुक करणारा टिप्पर पकडला

लाखनी पोलिसांची कार्यवाही
 
लाखनी राष्ट्रीय महामार्गावरील घटना

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :- लाखनी  येथील तहसील कार्यालयासमोर कोणतीही रॉयल्टी न बाळगता अवैधरीत्या रेतीची  वाहतूक करणार्‍या  टिप्पर  पकडल्याची घटना शनिवारी  (ता. २४ ) ला रात्री ११ .३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.  याप्रकरणी लाखनी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. भगवानदास विठ्ठल सोनवाने वय ४५  वर्ष व  प्रेमदास तुळशीराम राऊत वय ४१  वर्ष  रा. परसोडी सालेभाटा ता.लाखनी जि. भंडारा असे आरोपी ट्रक चालकाचे नाव आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे
शनिवारी  (ता.२५ ) रात्री ११.३०  वाजताच्या सुमारास लाखनी पोलिसांची पेट्रोलिंग सुरू होती. दरम्यान तहसील कार्यालयासमोरून रेतीची अवैधरित्या वाहतूक असल्याची गोपनीय माहिती लाखनी पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी तहसील कार्यालयाकडे जावून पाहिले असता पिवळ्या रंगाचा हायवा टिप्पर क्र. एम. एच. ३६  ए.ए.४२२१  राष्ट्रीय महामार्गाने अवैध रित्या रेतीची वाहतूक करणारा दिसला त्यावेळी चालकाला रॉयल्टी विषयी विचारले असता त्याच्याजवळ रॉयल्टी आढळून आले नाही. त्यामुळे  रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्याने  टिप्पर चालकावर लाखनी पोलिसात अप. क्रमांक २४६ /२०२३  कलम ३७९, ३४  भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिप्पर  व रेतीसह  पोलीसांनी २० लाख १९५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला आणले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या