Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌


💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - ८  जून 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. १८ ज्येष्ठ १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : उत्तरायण 
ऋतू :   ग्रीष्म 
मास :   ज्येष्ठ
पक्ष :    कृष्ण             
तिथी :  पंचमी (१८.५९) ~ षष्ठी                                    
वार :    गुरूवार
नक्षत्र : श्रवण (१८.५९) ~ धनिष्ठा   
राशी :  मकर 

*कोकिळा पंचमी*

*सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश* (सायं.  ०६.५० वाजता, वाहन हत्ती)

जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन 
जागतिक महासागर दिन
प्राणी संग्रहालयातील हत्तीसाठी जागतिक कृतीदिन

१६७०: पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.
१७०७: औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.
१७१३: मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडून राजकारणाने जिंकून घेतला.
१७८३: आईसलँड मधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक, हजार ठार.
१९१२: कार्ल लेम्ले यांनी यूनिव्हर्सल पिक्चर्स या कंपनीची स्थापना केली.
१९१५: लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहून पूर्ण केलेल्या गीतारहस्य या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
१९१८: नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध.
१९४८: एअर इंडिया ची मुंबई – लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९५३: कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९६९: लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.
१९९२: पहिल्यांदा जागतिक महासागर दिन साजरा केला गेला.
२००४: आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.

जन्मदिवस 
१९१०: लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक दिनकर केशव तथा दि. के. बेडेकर 
१९१७: भावगीत गायक गजाननराव वाटवे 
१९२१: इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो 
१९५५: वर्ल्ड वाईड वेब चे जनक टिम बर्नर्स-ली
१९५७: चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडिया 
१९७५: भारतीय अभिनेत्री आणि निर्माती शिल्पा शेट्टी

मृत्यूदिन 
६३२: इस्लामचे संस्थापक मोहंमद.
१९९५: रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार राम नगरकर 

*।। दास-वाणी ।।* 

वृत्तीरहित जें ज्ञान । 
तेंचि पूर्ण समाधान । 
जेथें तुटे अनुसंधान । 
मायाब्रह्मीचें  ।। 

मायाब्रह्म ऐसा हेत । 
मनें कल्पिला संकेत । 
ब्रह्म कल्पनेरहित । 
जाणती ज्ञानी  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०७/०५/१४-१५ 

वृत्तीला जे ज्ञान होते ते पंचमहाभूते, ज्ञानेंद्रिये आणि अनुषंगिक विषयांच्या संपर्कामधून होते. साधनेअंती वृत्तीच निवृत्त झाल्यावर शुद्ध आणि निर्विषेश ज्ञान प्राप्त होते. ते समाधान होय. अशा आत्मज्ञानी अवस्थेमधे माया आणि ब्रह्म हे द्वैत संपुष्टात येते.

माया ब्रह्म हया दोन कल्पना मनानेच साधकावस्थेत रचलेल्या असतात. मायिक दृश्य वस्तूंचा निरास करून
माझे मूळ आत्मरूप जाणून घेण्यासाठीच हे द्वैत मुद्दाम निर्माण केले जाते. मुळात परब्रह्म हे कल्पनारहित आणि कल्पनातीतच असते हे ज्ञानी पुरूष जाणतात. हे जाणणे म्हणजेच अद्वैत होय.

द्वैतकल्पनानिरसन समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या