Ticker

6/recent/ticker-posts

20 जुलै रोजी पोस्टल पेन्शन अदालत

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

सिंधुदुर्ग :- अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्गनगरी यांच्या कार्यालयामध्ये टपाल विभागातील पेन्शन धारकांसाठी, पोस्टल पेन्शन अदालत गुरुवार दि. 20 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित केली आहे. अशी माहिती सिंधुदुर्गनगरी विभागाचे अधीक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी दिली आहे.

           निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत. ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झालेला आहे. ज्यांचे 3 महिन्यांच्या आत निपटारा झालेला नाही अशा प्रकरणाचा डाक पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकारी इत्यादी आणि निती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. निवृत्तीवेतनधारक यांनी आपले अर्ज मयुरेश म.कोले, अधीक्षक डाकघर सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्गनगरी 416812 या पत्त्यावर दिनांक 18 जुलै 2023 रोजी किंवा त्यापूर्वी पाठवू शकता त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालत मध्ये विचार करण्यात येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या