Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभेचे चिंतन शिबीर संपन्न,गाव तिथे शाखा स्थापन करण्याचा केला निर्धार


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा चित्रा, न्यूज मो,986017256

उस्मानाबाद :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका उस्मानाबाद जि दक्षिण उस्मानाबाद येथे राज्य कार्यकारणीच्या मार्ग दर्शना नुसार उस्मानाबाद तालुका स्तरीय एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन स्मृती बुद्ध विहार,उस्मानाबाद येथे दिनांक 30/07/2023, रोजी,सकाळी 10.30 ते 05.00 या वेळेत करण्यात आले होते.तरी या शिबिरास श्रामनेर/बौद्धाचार्य/तालुका/शहर कार्यकारणीचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.चिंतन शिबिराच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमाचे पूजन करून चिंतन शिबिराला सुरुवात करण्यात आली. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन प्रमुख विश्वास पांडागळे,जि. संघटक,मीनाताई लागडे,जि.संघटक विद्यानंद वाघमारे,जि.संघटक विजय अ.बनसोडे यांनी चिंतन शिबिरात दिलेल्या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.या चिंतन शिबिरात मार्गदर्शन कार्यक्रमा नंतर उस्मानाबाद तालुक्यात गाव तिथे शाखा,गाव तिथे समता सैनिक उभा करण्याचा आणि भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्य नोंदणी अभियानातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.यावेळी चिंतन शिबिराच्या कार्यक्रमाची प्रस्तावाना तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केली तर उपस्थितांचे आभार यांनी मानले.या चिंतन शिबिरास महिला विभागाच्या ज्योतिताई लोखंडे,ता.संघटक अंजनाताई अरुण गजधाने,ता. सरचिटणीस उमाजी गायकवाड, संस्कार सचिव आदिनाथ सरवदे, समता सैनिक दललाचे सचिव सचिन राजेंद्र दिलपाक,समता सैनिक दलाचे ता. संघटक महादेव मुरलीधर ऐडके,ता.पर्यटन सचिव धनंजय वाघमारे,तर उस्मानाबाद कार्यकारिणीचे बाबासाहेब कांबळे,राजाभाऊ बनसोडे,मुकेश मोटे,रोहित गायकवाड,सुनील माळाले,सहदेव काठारे,यांची उपास्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या