Ticker

6/recent/ticker-posts

*अभंग क्र.१५०/२०९*


🚩 *रडोनिया मान।* 
   *कोण मागतां भूषण।।*
  मी विद्वान आहे, साधू आहे, मला मान-सन्मान द्या,असे
सांगण्यात कोणते भूषण आहे?
  देवाने जे आपणास दिले आहे,
त्याची गोडी चाखावी आणि साऱ्या विश्वाचे कौतुक करावे......
  शेतामध्ये बी पेरल्याबरोबर धान्य
निर्माण होणे आणि भिकाऱ्याला 
अन्नदान करणे,हे कसे बरे शक्य
आहे? 
  तुकाराम महाराज म्हणतात,
माणसाला मोठेपणा हा उतावळे
पणामुळे मिळत नसतो......
  जो धैर्याने,सात्त्विक मार्गाची
वाटचाल करत असतो,त्याला हिऱ्याची योग्यता प्राप्त होत असते आणि त्याचे जीवन
अनमोल बनते......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🪷 *पंढरीचा वारकरी* 🪷

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या