मेहुल भानुशाली जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज मो. न : 7039016364
ठाणे : शहरातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल हत्यार विक्रीच्या गुन्ह्यातील फरार आरोपी सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंग (२७) याला वागळे इस्टेट गुन्हे शाखा ५ च्या पथकाने मोठ्या शिताफीने महाराष्ट्र-मध्य प्रदेश या २ राज्यांच्या सीमेवरील पळासनेर गावातून अटक केली. आरोपीकडून पोलिसांनी २० गावठी बनावटीची स्टिल पिस्तुले, एक गावठी बनावटीची मशिनगन तसेच २
मॅग्झिनसह २८० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या शस्त्रांची किंमत अंदाजे साडेदहा लाख रुपये आहे.
आवसिंगला स्थानिक न्यायालयापुढे हजर केले असता त्याला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. मूळचा मध्य प्रदेशच्या बडवाणी जिल्ह्यातील आरोपी सुरजीतसिंग उर्फ माजा आवसिंगविरोधात ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून हा फरार आरोपी होता.


0 टिप्पण्या