तळोधी ( बा.) वनपरिक्षेत्रातील नागरिकांमध्ये शिरले भितीचे वातावरण
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मौजा सावरगाव परिसरात शेतात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढऊन ठार केल्याची खळबळजनक घटना घडल्याचे प्रकार उघडकीस आले आहे . ही घटना बुधवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने वनविभागासह तालुक्यात वाघ आला रे वाघ अशी खळबळ माजली आहे.
दुर्गा जीवन चनफने वय ४७ वर्षे असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, चिमूर तालुक्यातील सावरगाव परिसरात शेतात काम करणाऱ्या दाम्पत्यावर वाघाने हल्ला केल्याने पत्नीसमोर पती ठार झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. मंगळवारी याच वनपरिक्षेत्रात पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाने सावरगाव येथील शेतकऱ्याला ठार केले होते. ही दुसरी घटना आहे. यामुळे वाघाची दहशत मात्र परिसरात पसरली आहे.
दुर्गा चनफने ही महिला गावाजवळ असलेल्या तळोधी रस्त्यावरील आपल्या शेतावर सकाळी गेली होती. बराच उशीर होऊनही ती घरी परत का आली नाही ? अशा संशय कुटूबी यांना पडला त्यामुळे कुटुंबीय तसेच गावातील नागरिक तिचा शोध घेण्यासाठी शेताकडे गेले. बराच शोध घेतल्यानंतर शेवटी वाघाने हल्ला केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला. या बाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले आणि पंचनामा केला. आकापूर ग्रामपंचायतीने मार्च महिन्यात वनविभागास यासंबंधीची सूचना देऊन वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती. मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले. म्हणून ही भयावह घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. व संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


0 टिप्पण्या