प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
गोंदिया - गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथे काल आलेल्या मुसळधार पावसामुळे तिरोडा येथील रेल्वे स्टेशन रोड हड्डी घर पुला वरून पाणी वाहत आहे.
काल संध्याकाळी विजेच्या गडगडाट आणि मुसळधार पावसाने सुरवात झाली चक्क दीड ते दोन तास मुसळधार पाऊसाने झोडपले आणि पहाटे सुद्धा पाऊस आल्याने नाले भरून वाहत आहेत त्यात तिरोडाच्या रेल्वे स्टेशन रोड अस्वल चौक समोर हड्डी घराला लागून असलेला नालाच्या वरून पाणी वाहत आहे. या पुलाची उंची कमी आहे आणि तो वाढवण्याकरिता नगर परिषद ला निधी सुद्धा आली आहे असे माहिती मिळाली आहे पण या पुलाचे काम का करण्यात आले नाही हा तिरोडा वासियांना प्रश्न पडला आहे. तिरोडा वासियांची नगर प्रशासनाला मागणी आहे की या पुलाचे काम लवकरात लवकर चालू करून रेल्वे नी येणाऱ्या जाणाऱ्या यात्रे करू आणि शहरातील लोकांना सोईस्कर होईल असे मत अनेक नागरिकांचे आहे.


0 टिप्पण्या