🚩 *कन्या सासुऱ्यासी जाये।* *मागे परतोनि पाहे ।।*
मुलीचे लग्न होऊन ती सासरी
निघाली की आपल्या घराकडे व
घरातील लोकांकडे ती पाहते......
त्याप्रमाणे मी प्रपंचरूपी सासरी
आलो आहे......
तुझे मूळ स्वरूप जे माहेर,
त्याची मला ओढ लागली आहे.......
हे केशवा,तू मला केव्हा भेटशील?
आई दृष्टीआड झाली की लहान
मूल तिला टकमक बघत शोधत
असते......
तुकाराम महाराज म्हणतात, मासा पाण्याशिवाय जसा तळमळतो,तसा तुझ्या भेटीसाठी
मी तळमळत आहे......
🙏 *शुभ सकाळ* 🙏
🌹 *पंढरीचा वारकरी*🌹


0 टिप्पण्या