रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
अमरावती - जिल्हा कचेरीवर अमरावती जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्षा निशाताई शेंडे यांचा नेतृत्वात आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा शैलेश गवई, पूर्व जिल्हाध्यक्ष प्रा अशोक मोहोळ, जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष पश्चिम अंकुश वाकपांजर, जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष पूर्व अभिजित देशमुख, जिल्हा प्रवक्ता रामजी राठोड, आशिष लुल्ला, तसेच सर्व पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे -
१) जळगांव अमळनेर येथील मुस्लीम युवकाची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली होती, त्या संदर्भात ३०२ चा गुन्हा दाखल होणेबाबत.
२) बीड जिल्हा परळी येथील पोलीसांच्या मारहाणीत मुस्लीम युवकाच्या मृत्यु संबंधी पोलीस अधिकाऱ्यांवर ३०२ चा गुन्हा दाखल होणेबाबत.
३) नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावामध्ये भिमजयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या बौध्द युवक अक्षय भालेराव याची गावातील जातीयवादी गावगुंडांनी निर्घुण हत्या करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहीजे.
४) मुंबई येथील माता सावित्रीबाई वसतीगृहामध्ये मुलीवर बलात्कार व हत्या करणाऱ्यास फाशीची शिक्षा होणेबाबत.
५) लातुर जिल्ह्यातील रेणापुर येथे मातंग बांधवाची सावकारी वसुलीतून हत्या करण्यात आली असून संबंधीतांवर ३०२ चा गुन्हा दाखल होणेबाबत.
६) आळंदी येथे वारकरी संप्रदायावर जातीवादी सरकारकडून लाठीहल्ला करण्यात आला, संबंधीत पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करणेबाबत.
७) गायरान अतिक्रमण जमिनीचे पट्टे व घराच्या जमीनी नावाने करून देण्याबाबत. आदी मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या मोर्च्यातून करण्यात आल्या.


0 टिप्पण्या