पुणे :- गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोकणासह राज्यातील इतर भागात सक्रिय होण्यास सुरुवात केली आहे. पुढील 4,5 दिवस राज्यात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, मराठवाड्यासह इतर भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेचे महासंचालक के एस होसाळीकरांनी ट्विट करून ही माहिती दिली. पावसाने दडी मारल्याने पेरण्या रखडल्या तर काही ठिकाणी दुबार पेरण्याचे संकट आहे.


0 टिप्पण्या