Ticker

6/recent/ticker-posts

राजे म्हणतात,माझा बंदा तुझ्या अंगणात आला आहे.

मी लिहीलेले, फोटो, व्हिडिओ जर वाचले,पाहिले, आवडले आणि वाटले तर प्रसार करा.मी त्यासाठीच तर हे पाठवतो.शंभर पैकी दहा लोक तरी विचार करतील.दहा पैकी एक तरी हिंमत करून असे काम करील.
   बुद्धीमान,ज्ञानी, नीतिमान,साहसी माणसाला सहकार्य करा.अपेक्षित बदल तोच घडवतो.सहकार्य म्हणजे पैसे, अन्नधान्य , घरकुल, शौचालय, विहीर,गाय, म्हैस,बकरी , कोंबडी वगैरे नाही.नैतिक,मानसिक,हार्दिक आणि कृतीने सहकार्य करा.
बुद्धीमान ज्ञानी नीतिमान साहसी माणसे आपल्या काळात आपल्या अवती भवती असतात.आपण ओळखतो.पण काही दुष्ट दुर्जनांच्या भयाने घाबरून असतात.काही लोभाने स्वार्थाने गलितगात्र असतात.घरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विनंती करतात.राजे, पुन्हा जन्माला या.
राजे जर अशोक सराफ सारखे फोटोतून बाहेर आले असते तर कानफटीत मारली असती.म्हणाले असते, तुझ्या गावात,तु़झ्या गल्लीत , तुझ्या अंगणात माझा बंदा छातीठोकपणे बोलून जातो.तुला मुर्खाला कळत नाही का?जा बाहेर!पहा ,माझा शिलेदार काय हिंमतीने बोलत आहे.मंत्री ,संतरी, आमदार, खासदार, नगरसेवक,झेडप्या यांना उलटे टांगून खिसा खाली करतो.
   पोरं देणारा माणूस आणि मैदान_ए_जंग लढणारा पुरूष यात हाच तर फरक असतो.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या