रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
सातारा : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 या 4 वर्षाकरीताचे पुरस्कारासाठी इच्छुक महिला/संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
राज्यस्तरीय पुरस्कार रु.1,00,001/- रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे स्वरुप असून यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षांचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला ५ वर्षापर्यंत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
विभागस्तरीय पुरस्कार रु.25 हजार 1 /- रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असा असून यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्षे कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवाही पक्षातीत व राजकारणापासून अलिप्त असावी ,
जिल्हास्तरीय पुरस्कार रु.10 हजार 1/- रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असा असून यासाठी महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्षे सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे. त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार अनुज्ञेय राहणार नाही.
इच्छुक महिला/संस्थांनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सातारा यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला,एस.टी. स्टँड जवळ सातारा,ता.जि.सातारा दुरध्वनी क्रमांक 02162-237353 यांचेशी संपर्क साधावा. आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह आपला प्रस्ताव अर्ज व वर्षासह या कार्यालयास चार प्रतीत दि.31 जुलै 2023 पर्यंत सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ,व्ही.ए.तावरे यांनी केले आहे.
0000
आद्ययावत सुविधा व साहित्यासाठी खेळाडुंनी माहिती सादर करावी
रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
सातारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत खेळाडू विकास आराखडा तयार करण्यात येत असून सदर आराखड्यामधून जिल्ह्यातील खेळाडूंना अद्ययावत सुविधा व साहित्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तरी सातारा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर उच्चत्तम कामगिरी केलेल्या खेळ आपली संपूर्ण माहिती दिनांक 15 जुलै, 2023 पर्यत समक्ष जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्राम छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, यांनी केलेले आहे.


0 टिप्पण्या