महाराष्ट्र शासनाने असा आदेश काढला की, रिटायर्ड शिक्षकांना पुन्हा शिक्षकाची नोकरी देऊ.कमी पगारात काम करतील.
रिटायर्ड शिक्षकांना शिक्षकांची नोकरी देण्याऐवजी बेरोजगार, पर्याप्त शिक्षीत तरूणांना शिक्षकाची नोकरी दिली पाहिजे.कमी पगार दिला तरीही चालेल.असे माझे आणि सर्वांचे मत आहे.
पण हेच तरूण याच मंत्र्यांचे मंडप बांधतात. याच मंत्र्यांच्या
मिरवणुकीत नाचतात.हेच तरूण शिक्षक बनून मताचे पैसे रात्री घरोघरी जाऊन वाटतात.त्यामुळे या विषयाकडे कोणीही गांभिर्याने पाहात नाही.
मी जळगाव मधे नागरी सोयी सुविधांसाठी लढतो.असे सुशिक्षित, उच्चशिक्षित तरूण सोबत येत नाहीत.ते भयग्रस्त मानसिकतेत आहेत.आस्तित्व हिन आहेत.क्षीण ,दीन झाले आहेत.
आज तरूणांची स्थिती वाईट आहे.त्याला तरूण जबाबदार आहेत.आपण कितीही चांगला विचार केला,कितीही जोश आणला पण ज्यांना समस्या आहे, ते तर सोबत पाहिजे.पेशंट जर दवाखान्यात येतच नसेल तर डॉक्टर कशी मदत करणार?
महाराष्ट्रात आता राजकीय खेळ चालू आहे.तरूण फक्त मोबाईल चिवडत आहे.जर कोणी राजकीय चोरांच्या विरोधात चळवळ उभी केली तर ते सोबत येत नाही.हिच अवस्था शेतकऱ्यांची आहे.शेतकरी सुद्धा खाऊन पिऊन चोराला मतदान करतात.कोणताही आमदाराला कडक आवाजात बोलत नाही.तर मग,कोण कशाला घाबरेल?
जो नागरिक घाबरतो,तो या लोकशाहीत टिकणार नाही.राजकारण , शासन,प्रशासन हे क्षेत्र कुटुंब,समाज , धर्म यापासून वेगळे असते.तरूण तर धर्म युद्धात उतरला आहे.जाती युद्धात उतरला आहे.कुटुंबातून होरपळलेला आहे.त्याला शासन,प्रशासन , राजकारण माहिती नाही किंवा कळत नाही किंवा धाडस नाही.
कांग्रेस असो की भाजप , केंद्र व राज्य सरकारने सरकारी संस्थांना खाजगी केलीत.तेथे तर नोकरी बंद आणि मजूर भरती होतात.या सरकारी धोरणांचा तरूणांनी विरोध केला पाहिजे.पण ते राममंदिर साठी नाचले, मारामारी केली.बांधले आता राममंदिर.मग, नोकरी कशाला पाहिजे?गरज काय नोकरीची ?पोट भरले असेलच.
तरूण आपल्या भविष्याची चिंता करीत नाहीत.ते राजकीय जादुगारांचे कटपुतली बनलेले आहेत.उठ सूठ वडगाव बुद्रुक,नगर , कोल्हापूरच्या दंगलीमधे भाग घेतात.
तरूणांचे कौटुंबिक आणि सामाजिक अवमुल्यन होऊन दयनीय अवस्था झालेली आहे.लग्नासाठी मुली तयार होत नाहीत.नोकरी मागतात.लग्न , कुटुंब, संसार,संतती नाकारतात.म्हणजे तरूणांची चारही बाजूने अवहेलना होत आहे.नोकरी नाही.लग्न नाही.कुटुंब नाही.संसार नाही.तीस टक्के मुली नोकरी असो की नसो पण लग्न नाकारतात.त्यामुळे तीस टक्के तरूण बेकार आणि संटे राहातात.अशा तरूणांची मानसिकता भयंकर वाईट आहे.
प्रेयशीचे चुंबन घेणारा प्रियकर तिचे छत्तीस तुकडे का करतो?प्रेयशीचे मांस कुकरमध्ये का शिजवतो?प्रेयशीचे तुकडे कुत्र्याला का खाऊ घालतो?अशी मानसिकता का बनली?याचाही अभ्यास केला पाहिजे.तो सैतान झाला.तो हैवान झाला.तो राक्षस झाला.आधी प्रेमी होता.आधी मित्र होता.आधी दिलबर होता.असे कसे उलटे झाले?त्याला फासी द्या.त्याला जन्मठेप द्या. पण हे थांबणार आहे का?थांबले का? कारण शिक्षा हा इलाज नाही.प्रतिबंधक उपाय करणे,हाच एकमेव इलाज आहे.अशी वागणुक खाटीक सुद्धा बोकडाला देत नाही.जरी बोकड कापणे पारंपरिक धंदा असला तरी सुद्धा!
नोकरी वाचून तरुण आत्महत्या करतात.छोकरी वाचून समलिंगी लग्न करतात.तृतीयपंथी व्यक्तीशी लग्न करतात.तरूणांची इतकी भयानक अवस्था आज याच राजकीय लोकांनी आणून ठेवलेली आहे.आणि आम्ही समाजसेवक,धर्ममार्तंड त्यांच्या मागे पळत आहोत.ते गल्ला आणि गिल्ली ही पळवतात.आणि तरूणांना उल्लू बनवतात.
यावर उपाय आहे.तरूण असो की तरूणी लग्न केले असेल तरच नोकरी दिली पाहिजे.किमान एका तरूणाचा संसार उभा राहिल.
दोघांपैकी एकालाच सरकारी किंवा खाजगी नोकरी दिली पाहिजे.नोकरीचे एकास एक वाटप होईल.
अविवाहित तरूण किंवा तरूणीला नोकरीवर ठेवू नये.जेणेकरून कुटुंब व्यवस्था,समाज व्यवस्था , धर्म व्यवस्था टिकून राहिल.हे खूप आवश्यक झाले आहे.
महाराष्ट्र शासनाने असा आदेश काढला की, रिटायर्ड शिक्षकांना पुन्हा नोकरी वर ठेवू.तर तरूणांना आपल्या आमदाराला मोर्चा नेऊन पत्र दिले पाहिजे.
का रे,नालायका!तू मंत्री बनून कमीशन घेतो.आम्ही काय आयुष्य भर तुझे जोडे उचलायचे का? निवडणुकीत आजचे जे नालायक आमदार आहेत, त्यांच्या विरोधात घरच्या भाकरी खाऊन प्रचार केला पाहिजे.
आता सुद्धा तरूणांनी प्रत्येक तालुक्यातील एका ठिकाणी बैठक बोलवून आमदारांचा,शिक्षणमंत्रीचा, मुख्यमंत्रीचा ,विरोधी पक्षनेत्यांचा विरोध केला पाहिजे.
हाच एक संविधानिक मार्ग आहे.
चूप बसू नका.घराच्या बाहेर पडा.बोला.विरोध करा.नक्कीच परिणाम होईल.वेळ भरपूर आहे.कोणताही माणूस फक्त एक तास वाचन किंवा मनन करतो.दीड तास सिनेमा किंवा दृष्य पाहातो.दोन तास भाषण, किर्तन, प्रवचन ऐकतो.खूप वेळ रिकामा असतो.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या