Ticker

6/recent/ticker-posts

जळगाव शहरातील हे पहा नरकनगर!

     आम्ही जळगाव शहरातील जुना खेडी रोड मधील सुंदरनगर मधे गेलो.तेथे या माणसाच्या घरासमोर कॉलनी तील गटार तुंबून पाणी वास मारते.दुर्गंधी येते.डास मच्छर झाले.किटाणू विषाणु जन्माला आले.हा माणूस किती केविलवाणा झाला आहे!म्हणे माझ्या घरातील सर्वच सदस्य आजारी पडले.वीस हजाराचा दवाखाना झाला.हरे राम! हे राम मंदिर बांधणारे सरकार.हे राम मंदिर पक्षाचे आमदार.हे राम मंदिर वाले नगरसेवक.मला तर रावण वाटले.उलट्या काळजाचे.माणसे मरोत की जगोत ,यांना काहीच सोयरसुतक नाही.यांना पाहिजे फक्त मत.फुकट असो की विकत.बस्स! निवडून आले की यांची जबाबदारी संपली.
    आता या प्रभागातील नगरसेवकांना पुन्हा निवडून देऊ नये.हाच एक रामबाण उपाय आहे.नगरसेवक बदलला की,पुढचा शहाणा होईल.काम करील.ज्या कामांसाठी नगरसेवक निवडला जातो,ते काम.

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या