भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
गोंदिया ( गोरेगाव ) : शिक्षण हा संविधानाने दिलेला मुलभूत हक्क आहे. व शिक्षणाची संधी देशातील सर्व लोकांना समान मिळायला हवी. व भारतात शिक्षण हा नाॅन प्राफिटेबल असला तरी यामध्ये आता शिक्षण संस्थांच्या द्वारे करोडो रुपये नफा कमावला जात आहे. याकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन रेखलालभाऊ टेंभरे (डायरेक्टर जीडीसीसी बॅंक गोंदिया) यांनी केले आहे.
भारतात श्रीमंतांचा लेकरू लाख रुपये खर्च करून महाग शाळेमध्ये शिक्षण घेतो, व गरिबाचा लेकरू जिल्हा परिषद च्या थकलेल्या शाळेत शिक्षण घेण्यास लाचार आहे. कारण गरीब व्यक्ती खाजगी शाळांमध्ये शिक्षणासाठी वर्षाचे १ लक्ष रुपये खर्च करू शकत नाही. जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये मध्ये ७ वी पर्यंत च्या वर्गांसाठी फक्त ३ शिक्षक आहेत. व हे गरिबांच्या मुलांवर अत्याचार आहे. शासनाने या मुलभूत गरजेचा विचार करून अशा निकृष्ट व्यवस्थेला दुरुस्त करावे असे निवेदन रेखलाल टेंभरे (डायरेक्टर जीडीसीसी बॅंक गोंदिया) यांनी दिले.


0 टिप्पण्या