Ticker

6/recent/ticker-posts

शाहीर प्रदीप कडबे सन्मानित


रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515


नागपूर :-रामटेक साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती समारोह, गुरुवंदन सोहळा व शाहिर मेळाव्यात

सम्यक सांस्कृतिक लोककला निकेतन अंतर्गत राष्ट्रीय आझाद तिरंगा निशान खडीगंमत कलापथक पळसाड तालुका कामठीच्या वतीने किरणापुर येथील भीमशाहीर प्रदीप बागवान कडबे यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पळसाड येथे हा कार्यक्रम  आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात उज्ज्वला पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व जि. प. दिनेश ढोले यांच्या हस्ते उद्घाटनाने झाली. सम्यक सांस्कृतिक लोककला निकेतनचे संस्थापक अध्यक्ष शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांच्याहस्ते शाहीर प्रदीप कडबे यांचा प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

सूत्रसंचालन शाहीर अलंकार टेंभुर्णे आणि शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी केले. याप्रसंगी भारतीय शाहीर कलाकार मंडळ कामठीचे राजकुमार घुले, वृद्ध कलावंत मानधन समिती नागपूरच्या  अध्यक्षा सोनूताई कुथे, सरपंच मनोज कुथे, शाहीर अंबादासजी नागदेवे, शाहीर माणिक देशमुख, शाहीर विजय चकोले शाहीर ब्रह्मा नवघरे, शाहीर माधुरी पाटील, शाहीर आर्यन नागदेवे, शाहीर भगवान निनाद बागडे, शाहीर सुबोध काणेकर, शाहीर निशान सुखदेव, शाहीर ज्ञानेश्वर वाघमारे तसेच मान्यवर इतर उपस्थित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या