संतोष मगदुम प्रतिनिधी सांगली मो9146963985
सांगली : -जत तालुक्यातील १५ गावात नवे तलाठी व मंडल कार्यालयाच्या इमारती उभा राहणार आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी या १५ गावात नव्या इमारती उभाराव्यात यासाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. आ. पडळकर यांच्या मागणीला महसूल मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या १७ जुलैपर्यंत या संदर्भाचा अहवाल सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
. जत तालुक्यातील खलाटी, जिरग्याळ, मुचंडी, बाज, शेड्याळ, प्रतापूर, सोनलगी, पाच्छापूर, करेवाडी (को. बो. ), सोरडी, पांडोझरी, मोरबगी, गोंधळेवाडी, सोन्याळ, उंटवाडी या गावातील मंडल कार्यालय व. तलाठी कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत.
या गावात नव्या इमारतीवर यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे महसूल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला होता.


0 टिप्पण्या