Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभेचे मालेगावात चिंतन शिबीर संपन्न !

येणारा काळात नव धम्मक्रांती अभियानात यशस्वी करूया

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

नाशिक - भारतीय बौद्ध महासभा शाखा नासिक जिल्हा पूर्वचे चिंतन शिबिर आय.एम. ए. हॉल मालेगाव येथे गौरव पवार (जिल्हाध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. चिंतन शिबिराला मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलेले केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख सुप्रियाताई कासारे (केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख) यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

 सुप्रिया ताई कासारे यांनी प्रबोधनाची आचार संहिता या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, महामानव यांचे विचार सांगताना कोणतीही भेसळ करु नये. कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी करायची नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धम्म क्रांती गतिमान करणे आर्थात बीएसआय मिशन या विषयावर मार्गदर्शन करताना धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी 'चलो बुद्ध की और' या जाती अंत चळवळ अभियाना अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी कामाला लागावे.

प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात बुद्ध विहार नोंदणी करणे, बुद्धविहार, स्थानिक मंडळ जोडो अभियान राबविणे, पदाधिकारी यांनी लीच्छावीचे ७ नियम पाळून काम करणे, सर्वांनी एकत्रित समन्वयाने काम करणे नवदिक्षित झालेल्या लोकांबरोबर रोटी बेटी व्यवहार करणे त्यांना संघटनेत पसक्रिय सहभाग करून घेणे, समाजातील डॉक्टर / वकील यांच्या सोबत बैठक घेऊन समाजाला फायदा होईल असे अभियान राबविणे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत सहायता व सल्ला केंद्र निर्माण करणे, कार्यान्वित 
शाखांचा आर्थिक हिशोब कसा ठेवावा ? या विषयावर प्रत्येक शाखांनी कॅशबुक, प्रोसेडींग बुक, आवक / जावक रजिस्टर , फाईल, आदेश फाईल , व्हाउचर , भरणा बुक, जमा खर्च अहवाल संस्थेच्या बॉयलॉज प्रमाणे करणे असे मार्गदर्शन करताना सांगितल.

कार्यक्रमाचे जिल्हाध्यक्ष गौरव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, बौद्ध धम्म चळवळ ही आपल्याला गाव तिथेपर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्वांनी एक दिलाने कामाला सुरुवात करावी. घर तिथे संस्थेचा पदाधिकारी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे. भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी संपूर्ण भारतात धम्म चळवळीला गती देण्यासाठी जे आठ गोल्डन मार्क सांगितले होते, त्याचा अवलंब करून आपल्या भागातील विहारांना संस्कार केंद्र द्वारे सक्रिय करून येणाऱ्या नव पिढीवर धम्म संस्कार शिबिराच्या माध्यमातून संस्थेत संस्थेतर्फे दिले जाणाऱ्या 24 प्रकारचे शिबिराचा आयोजन नियोजन सुरू करायचे. 

 सध्या सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या धम्म क्रांती पुढील आव्हाने हे जनमानसात जाऊन सांगायचे आहे. भारतीय बौद्ध महासभेतर्फे चलो बुद्ध की और या अभियान अंतर्गत प्रत्येक कुटुंबात बौद्ध कुटुंब नोंदणी व सदस्य अभियान याला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायचाय वाढणी आहे. आपापल्या भागाचा सर्वे करून सदस्य नोंदणी अभियान यशस्वी कसे होईल यासाठी सर्वांनी आराखडा तयार करून वर्षावास कालावधीत किमान दहा हजार सदस्य पूर्ण करण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करूया. सभासद मोहीम यशस्वी करायची आहे. यावेळी संस्थेच्या आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेचे अ जीवन सदस्य म्हणून 65 पदाधिकारी यांनी नाव व प्रथम सदस्य नोंदणी अभियान म्हणून 2500 पावतीचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्ह्याचे सरचिटणीस सतिष गांगुर्डे यांनी केले, आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष जयवंत निकम यांनी केले. संदीप भास्कर खरे, रमेश देवमन खरे, शांताबाई भालेराव, सुजाताताई पटाईत, लतिकाताई निरभवणे, वाल्मीक कापडे, डॉ.मोतीराम पानपाटील, प्रदीप तुकाराम शिंदे, प्रकाश दाणी, नलिनीताई गायकवाड ,सिंधुताई म्हसाने, प्रतिभाताई धिवरे, काशाताई जाधव, शोभाताई निकम , माणिक कटारे, भास्कर गांगुर्डे ,जगन्नाथ केदारे, मच्छिंद्र भोसले ,वाल्मीक गरुड, योगेश खैरे, विलास भालेराव, आनंद मैराळे,संजय मोरे, बापू सवाखंडे, विठाताई धिवर, भास्कर रत्नाकर सोनवणे, दिपक यशोद, मंगला म्हसदे, शालिनीताई धनराव, डॉ. सिद्धार्थ जगताप, के एस महिरे, लक्ष्मी केदारे ,
 उषाताई पठाडे, राजश्री उत्तम सोनवणे, पद्माताई जगन तायडे, 
रंजनाताई उबाळे, उत्तम खरे, यमुनाताई केदारे ,ज्योती अतुल जगताप, उषाताई गायकवाड , मायाताई त्रिभवन, लताबाई उबाळे, रवींद्र निकम ,नानूताई सुळे, इंदुबाई पगारे, उषाताई संसारे, इंदुबाई उबाळे, वाल्मीक देवरे ,मंगेश निकम, अभिजित पवार, विशाल पवार , संतोष धनराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या