मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद :- दि.13/07/2023 रोजी,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या उस्मानाबाद तालुका कार्यक्रम पत्रिके प्रमाणे मु. पो.चिखली ( भीमनगर ) येथे बहुसंख्य उपासकांच्या उपस्थिती मध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी का होतं नाही या विषयावर जि. संघटक,विजय अशोक बनसोडे यांचे वर्षावास धम्म प्रवचन संपन्न झाले.या बाबत सविस्तर वृत्त असे कि,भारतीय बौद्ध महासभा उस्मानाबाद जिल्हा शाखेकडुन उस्मानाबाद तालुक्यात पविञ वर्षावासा निमित्त धम्म प्रवचन कार्यक्रमांचे विविध गांवात आयोजन करण्यात आले आहे.त्यानुसार मौजे वलगुड येथे प्रथम धम्मप्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मा.साळुंखे लताबाई लिंबराज आणि मा. विमल लिंबराज हस्ते तथागत गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे धुप,दिप व पुष्प अर्पण करुन पुजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली यानंतर प्रवचनकार विजय अशोक बनसोडे तसेच मुकेश मोटे यांचा गुलाब पुष्प देऊन यथोचित सम्मान करण्यात आला.यावेळी धम्म प्रवचनकार तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आयु.विजय अशोक बनसोडे यांनी तथागतांचा कर्म सिद्धांत आणि संविधान विषयांवर अनेक दाखले व उदाहरणे देवून प्रवचन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रा. सदस्य बापू जावळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार विमलताई गंगावणे यांनी मानले.या कार्यक्रमांस बहुसंख्येने भीमनगरातील बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थिताना जावळे परिवाराकडून पवित्र खीरदान करण्यात आले.


0 टिप्पण्या