मेहुल भानुशाली जिल्हा प्रतिनिधी ठाणे चित्रा न्यूज मो.न : 7039016364
ठाणे : रक्ताचा तुडवटा निर्माण झाल्याने गरजूंना वेळेवर रक्त मिळून
जीवनदान मिळावे यासाठी आपलं प्रतिष्ठान ह्या संघटनेच्या वतीने सोमवार १७ जुलै रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन आपलं प्रतिष्ठान ह्या संघटनेचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी केले आहे.
सोमवार १७ जुलै रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत कल्याण पश्चिमेतील महापालिका मुख्यालयासमोरिल स्वामी नारायण हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गरजूंना रक्त मिळावे हा जसा हेतू आहे तसा १७ जुलै रोजी सोमवारी गटारी अमावस्या असली तरी बरेच जण आदल्या दिवशी रविवारीच मद्याचा आस्वाद घेत गटारी साजरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दुसरया दिवशी रक्तदान करू शकणार नाहीत. यासाठी तळीरामांनी रक्तदान करून गटारी साजरी करण्याची नविन परंपरा सुरु करावी हा देखिल हेतू असल्याचे आपलं प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी सांगितले.


0 टिप्पण्या