Ticker

6/recent/ticker-posts

कवडगाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ. राधिका आढाव तर उपाध्यक्षपदी श्री. शत्रगुन राऊत यांची निवड...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098

अहमदनगर :-  आज दिनांक 8 जुलै 2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडगाव  ता. जामखेड या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीला दोन वर्षे पूर्ण झाल्याकारणाने नवीन समितीची पुनर्रचना करण्यात आली .सर्व पालकांच्या संमतीने शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. राधिका सोमेश्वर आढाव यांची तर उपाध्यक्षपदी श्री.शत्रगुन संदिपान राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  यावेळी सर्व पालक व शिक्षकांच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मावळते अध्यक्ष श्री. दिपक शांताराम राऊत व उपाध्यक्ष सौ.नीता बाळासाहेब चोरखले यांचाही सन्मान करण्यात आला.
        यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब वाघ सर यांनी शालेय व्यवस्थापन समितीची कामे व कर्तव्य समजावून सांगितली तसेच शाळेतील आदर्श शिक्षक श्री.बबन यादव सर यांनी एकमेकांच्या सहकार्याने शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचा मनोदय व्यक्त केला.
        आजच्या या कार्यक्रमासाठी श्री.राम वाघमारे, श्री.बाळासाहेब भोरे, श्री. सोमेश्वर आढाव, श्री.आण्णा भोरे, श्री.दादा आढाव,श्री. सिद्धार्थ आढाव, श्री.संभाजी शेगडे, श्री.बाळासाहेब चोरखले, श्री.अशोक भोरे, श्री.महेंद्र बांगर,श्री. शैलेश मगर, श्री. सुभाष भोरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या