Ticker

6/recent/ticker-posts

यशपाल जवळगे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना माढा तालुक्याचे वतीने टेंभुर्णी येथे सन्मान

सोमनाथ खंडागळे जिल्हा सोलापूर प्रतिनिधी

पुणे -: पुण्यात मागील आठवडय़ात घडलेल्या मुलीवरील अमानवी कोयता हल्ल्यादरम्यान ज्या तरूणांनी जीवावर उदार होऊन त्या मुलीचे प्राण वाचवले असे M P S C चा अभ्यास करनारे लेशपाल जवळगे व हर्षद पाटील यांचा पुणे येथील कार्यालयात मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजसाहेबांनी देखील ह्या जिगरबाज तरुणांचं कौतुक करून, मायेने विचारपूस केली तसंच त्यांना भविष्यात कोणतीही मदत लागली तर मी आहे, असं म्हणत त्यांचे धाडसाला प्रोत्साहन दिलं तसेच यशपाल जवळगे हा तरुण सोलापूर जिल्ह्य़ातील माढा तालुक्यातील पुणे-सोलापूर हायवेलगत असणारे (आढेगाव)या गावचा रहिवाशी आहे ही सोलापूर जिल्ह्य़ाकरिता आभिमानाची बाब आहे त्याच अनुशंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना माढा तालुक्याचे वतीने व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष मा प्रशांतजी गिड्डे व ईतर सर्व पदाधीकारी यांचे वतीने प्रथम करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास हार घालून नंतर या माढा तालुक्यातील सुपुत्राचा छत्रपतींच्या साक्षीने टेंभुर्णी ता.माढा(सोलापूर)येथे सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ पत्रकार सदाशिव(अण्णा)पवार,सुभाष (बापु)खटके-पाटील,बाळासाहेब टोणपे, सागर लोकरे, अनिल आरडे, सिद्धेश्वर व्यवहारे,समाधान पाटील,कुंदन सुक्रे,संभाजी वाघे संदीप करंगळ,अमोल जेधे, ओंंकार पवार, व मनसे सैनिक कार्यकर्त उपस्थित होते 💐💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या