Ticker

6/recent/ticker-posts

समाजसेविका सविता बेदरकर ह्या दुसऱ्या सिंधूबाईच

• ॲड. प्रशांत गणवीर यांचे प्रतिपादन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324


भंडारा :- समाजसेविका ॲड. डॉ. सविता बेदरकर यांनी हजारो गरीब निराधार, वृद्ध, बेरोजगार यांना अविरत मदत करून कुठलीही अपेक्षा न करता अहोरात्र समाज प्रबोधन करीत असल्यामुळे अनेकांसाठी त्या आदर्श व दुसऱ्या सिंधुताई सपकाळ ठरल्याचे ॲड. प्रशांत गणवीर यांनी निराधारांना अन्नधान्य, किराणा व शालेय साहित्य वितरण प्रसंगी पोलिस ठाणे लाखनी येथे झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना विचार व्यक्त केले. 
            समाजसेविका सविता बेदरकर व मित्र परिवाराचे वतीने पोलिस ठाणे लाखनी येथे गरजू व निराधारांना अन्नधान्य, जीवनोपयोगी वस्तू व शालेय उपयोगी साहित्य वितरण समारंभ बुधवारी(ता.१६) आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी समाजसेविका सविता बेदरकर, प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, प्राचार्य प्रल्हाद सोनवाने, सामाजिक कार्यकर्ता ॲड. प्रशांत गणवीर, प्रहार अपंग क्रांती चे तालुका प्रमुख सुनील कहालकर, शहर प्रमुख रामचंद्र निर्वाण, शहर सचिव प्रेमचंद निर्वाण, जुनेदखा पठाण, केसलवाडा चे पोलिस पाटील सचिन सार्वे प्रामुख्याने उपस्थित होते. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या  वर्षातून ४ वेळा कधी गोंदिया तर कधी लाखनी येथे जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात येते. लाखनी तालुक्यातील कांबळे परिवार सिपेवाडा, जांभूळकर परिवार केसलवाडा/वाघ व कळपते परिवार केसलापुरी यांना १५० किलो तांदूळ, ५० किलो गहू, गोडेतेल पिपा, किराणा व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी गरजूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तर प्राचार्य प्रल्हाद सोनवाने यांनी सविताताई च्या कार्याचे कौतुक केले. यावरून निराधारांना मदत करणाऱ्या समाजसेविका सविता बेदरकर ह्या दुसऱ्या सिंधुताई सपकाळ आहेत म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या