कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- सामाजिक कार्यकर्ते यशवंत खेडीकर यांनी पंचवटी चौक पोहरा येथे राष्ट्रीय सणानिमित्त ध्वजारोहणाची परंपरा सुरू केली. दरवर्षी माजी सैनिक अथवा सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांकडून ध्वजारोहण केले जात असे. पण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षापासून त्यांनी एक नवा पायंडा पाडला. गावातील सर्वात जास्त गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ध्वजारोहण करण्याचे ठरविल्याने स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापन दिनी शैक्षणिक सत्र २०२२ मध्ये श्रीराम फटे विद्यालयातून इयत्ता १०वी मध्ये प्रथम क्रमांक संपादन करणाऱ्या सुषमा संतोष चाचेरे व द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्या वैष्णवी प्रकाश ठाकरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थिनी त्यांचे आई-वडील, श्रीराम फटे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एम. फटे, पशू वैद्यकिय दवाखान्यात नुकतेच रुजू झालेले पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक मनकुंटीवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तमुस अध्यक्ष नारायण निर्वाण, विवेक गिरेपुंजे, साजन मोटघरे, भगवान दिघोरे, आशिष शिवणकर, राजू बोरकुटे, वैभव दखणे यांचे सह पंचवटी चौक झेंडा समितीचे संस्थापक यशवंत खेडीकर व प्रभागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नीरज शिवणकर, सुभाष नेवारे, लोकेश कांबळे, प्रज्वल मोहतुरे, दुर्गेश शिवणकर, जागेश्र्वर चाचेरे, प्रफुल्ल दखणे, खुशाल दिघोरे, सुदाम दिघोरे यांनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या