🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - ११ ऑगष्ट
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. २० श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : अधिक श्रावण
पक्ष : कृष्ण
तिथी : एकादशी (अहोरात्र)
वार : शुक्रवार
नक्षत्र : मृग (३०.००) ~ आर्द्रा
राशी : वृषभ (१७.००) ~ मिथुन
(कमला एकादशी शनिवारी आहे.)
*क्रांतिकारक खुदीराम बोस बलिदान दिन*
२०१३ : डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
२००८: अभिनव बिंद्रा याने बैजिंग आॕलिंपिक मध्ये भारताच्या वतीने १० मिटर एअर रायफल नेमबाजीतील पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक व भारताला १९८० नंतरचे पहिले आॉलिंपिक सुवर्ण पदक जिंकून दिले.
१९९९ : बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा आजवरचा तो सर्वात छोटा खेळाडू आहे.
१९९९ : शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले.
१९७९ : गुजरातेतील मोर्वी येथील धरण फुटून हजारो लोक मृत्यूमुखी पडले.
१९६१ : दादरा व नगर हवेली हा भाग भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
१९४३ : सी. डी. देशमुख हे ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया’चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
१८७७: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध लावला.
जन्मदिवस
१९११: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक प्रेम भाटिया
१९२८: लेखक व पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे
१९२८: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा
१९४४: फेडएक्स चे संस्थापक फ्रेडरिक स्मिथ
१९५०: ऍपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक स्टीव्ह वोजनियाक
१९७४: अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू व कर्णधार अंजू जैन
मृत्यूदिन
१९०८: खुदिराम बोस, क्रांतिकारक
१९७०: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे
२०००: पी. जयराज – मूकपटांच्या जमान्यापासून हिन्दी चित्रपटसृष्टीचे साक्षीदार असलेले दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (१९८०) अभिनेते
२०१३: भारतीय पक्षीशास्त्रज्ञ आणि लेखक जफर फटहॅली
*।। दास-वाणी ।।*
ठस ठोंबस ठाकावेना ।
ठक ठक ठक करावेना ।
ठाके ठमके ठसावेना ।
मूर्तिध्यान ।।
डळमळ डळमळ डकों नये ।
डगमग डगमग कामा नये ।
डंडळ डंडळ चुकों नये ।
हेकांडपणें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १४/०४/१२-१३
ठोंब्या निर्बुद्ध माणसाने खरे तर कीर्तनाला उभेच राहाता कामा नये.
ईश्वराच्या सगुणरूपाचे ध्यान सामान्य श्रोत्यांच्या मनावर ठसविणे हे सोपे काम नाही.
कीर्तनामधे उगीचच तबला मृदुंगाचे ठक ठक टुम टुम असे आवाज काढू नये. रंगाचा बेरंग होतो.
पायांतील चाळांचा फार काळ ठुमकत ठुमकत गलका करून कथेचा विचका होतो.
हरिकथेमधे सिद्धांत मांडणी डळमळीत नको. तो सिद्ध करण्यासाठी उदाहरणे देताना दृष्टांत पेरणी सकस आणि अचुक हवी.
सांगताना चूक झाली तरी डगमगता कामा नये. शांतपणे सावरले पाहिजे.
अहंकारापायी हट्टाने इरेला पेटून आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा हेकट प्रयत्न कीर्तनकाराने कदापी करता कामा नये.
कीर्तनलक्षण समास.
🙏 💐💐💐💐💐 🙏


0 टिप्पण्या