🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - १४ ऑगष्ट
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. २३ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : अधिक श्रावण
पक्ष : कृष्ण
तिथी : त्रयोदशी (१०.२०) ~ चतुर्दशी
वार : सोमवार
नक्षत्र : पुनर्वसु (११.००) ~ पुष्य
राशी : कर्क
*शिवरात्र*
*अखंड भारत संकल्प दिन*
*फाळणी आपदा स्मरण दिवस* (भारत)
जागतिक सरडा (पाल) दिवस
१६६०: मुघल फौजांनी संग्रामगड (चाकणचा किल्ला) ताब्यात घेतला.
१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना
१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.
१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.
१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.
१९४५: दोन अणुबाँबच्या भयावह संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.
१९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.
१९४७ः भारताची दुःखद फाळणी होऊन स्वतंत्र पाकिस्तान देश निर्माण झाला
१९५८: एअर इंडियाची दिल्ली – मॉस्को विमानसेवा सुरू झाली.
२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.
,
जन्मदिवस
१९००: महाराष्ट्रीयन ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,पत्रकार, अभ्यासक आणि वक्ते , ३ वेळा महापौर राहिलेले, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जाणारे स.का. पाटील
१९०७: गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.
१९११ : वेदतिरी महाऋषी, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९२३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार, सिंडिकेटेड स्तंभलेखक, मानवाधिकार कार्यकर्ते, लेखक आणि इंग्लंडमधील माजी उच्चायुक्त कुलदीप नायर
१९२५ : जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार. साहित्यिक व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत.
१९५७: विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर
मृत्यूदिन
१९५८: जीन फ्रेडरिक जोलिओट – मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या (Isotopes) शोधाबद्दल नोबेल पारितोषिक (१९३५) मिळवणारा फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक
१९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव. शिवछत्रपती पुरस्कार (मरणोत्तर)
१९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी
२०११: शम्मी कपूर, अभिनेता
२०१२: विलासराव देशमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री
*।। दास-वाणी ।।*
राजे राज्य सांडून गेले ।
भगवंताकारणे हिंडलें ।
कीर्तीरूपे पावन जाले ।
भूमंडळी ।।
ऐसा जो कां योगेश्वर ।
अंतरी प्रत्ययाचा विचार ।
उकलूं जाणे अंतर ।
प्राणीमात्रांचे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : १४/०७/११-१२
भरत, गौतम, वर्धमानासारखे कित्येक राजे असे होऊन गेले की सत्ता वैभव संपत्तीचा सर्वसंगपरित्याग करून भगवंताच्या प्राप्तीसाठी रानोमाळ हिंडले. जागोजागी खडतर तपश्चर्या तीर्थयात्रा करून देव आपलासा केला. त्यांच्या वैराग्याच्या कीर्तीने हे राजे राजर्षी म्हणून ख्यातनाम झाले. पुण्यवंत झाले.
ब्रह्मस्थितीला प्राप्त झालेला असा हा योगेश्वर मनामधे प्रत्यय म्हणजे अनुभूतीचा विचार खोलवर रूजल्यामुळे सृष्टीमधील सर्वच प्राणीमात्रांचे ह्रदय उकलू शकतो. प्रत्येक जीवामधील भक्तीचे सूप्त झरे हा राजर्षी प्रवाहित करतो.
युगधर्मनिरूपण समास.
🙏 💐💐💐💐💐 🙏
0 टिप्पण्या