रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
पुणे - वंचित बहुजन बहुजन आघाडी पुणे शहर सचिव स्वप्निलभाऊ वाघमारे व डॉ.आंबेडकर युथ मंडळ संयुक्त विद्यमाने नेत्र ज्योती फाउंडेशनतर्फे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या १०३व्या जयंती निमित्त पुण्यात डोळ्यांची साथ सुरू असताना त्यावर ऊपाय म्हणुन ७८६ भवानी पेठ, सिद्धार्थ हौ. सोसाइटी (मंजुळाबाई चाळ) पुणे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर संघटक रफिक भाई शेख यांच्या मार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला.
यावेळी डॉ.आंबेडकर युथ मंडळाचे अध्यक्ष मंगेश जगताप, अक्षय जाधव, शुभम कांबळे,गणेश कुचेकर, प्रणव कुचेकर,ऋतिक चाबुकस्वार, सिद्धांत गायकवाड, सुशांत भदागरे, तेजस शिंदे, कामेश कांबळे, सलमान शेख, ओंकार जांभळकर ,ऋतिक दळवी ,प्रतीक चाबूकस्वार, सुशील सूर्यवंशी, धीरज मोरे वसीम शेख सुमित बडेकर,जयेश कांबळे, सौरव बडेकर,अंश जाधव, रुशी जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाला पुणे शहर अध्यक्ष मुनावरभाई कुरेशी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार यूनियनचे सचिव रितेष गायकवाड, वंचित बहुजन आघाडी शहर उपअध्यक्ष विकास भेगडे पाटील, शहर सचिव प्रो. सावळे सर, शहर सदस्य पितांबर धिवार, हडपसर विधानसभा महासचिव सोमनाथ लोंढे व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच फोनद्वारे शहर महासचिव अरविंद तायडे यांनी शुभेच्छा दिल्या.


0 टिप्पण्या