सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं.7058137098
अहमदनगर :- सध्या जामखेड तालुक्यात डोळे येण्याची साथ वाढत आहे. अगदी ३ वर्षांच्या चिमुकल्यांपासून वृद्धापर्यंत सर्वच जण या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. दररोज शासकीय व खासगी रुग्णालयात १०० पेक्षा जास्त रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागाकडून सध्या तरी जनजागृती केली जात आहे.
पावसाळ्यात येणाऱ्या साथींपैकी 'डोळे येणं' हा एक प्रमुख आजार आहे. हा वेगाने पसरणारा आजार आहे. हा गंभीर स्वरूपाचा नसला तरी संसर्गजन्य आहे. त्यामुळे डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर त्याचा परिणाम होतो. बॅक्टेरियल किंवा व्हायरसमुळे डोळे आलेले असल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो. या आजारात रुग्णांमध्ये डोळे लाल होणे, वारंवार पाणी गळणे, सूज
जामखेड तालुक्यातील जवळा येथे आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी शाळा, अंगणवाडीत घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे.
डोळे येण्याची लक्षणे काय ?
डोळ्यात टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटणे, डोळे लाल, गुलाबी होणे, डोळ्यांना खाज सुटणे, जळजळ होणे, सकाळी झोपेतून उठताना पापण्या एकमेकांना चिकटून बसणे, पापण्यांना सूज येणे अशा प्रकारची लक्षणे या साथीची आहेत.
येणे अशी लक्षणे आढळतात. जामखेड तालुक्यातील जवळा येथे घरोघरी जाऊन आरोग्य अधिकारी आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी ३१ जुलैपासून सर्वेक्षण सुरू केले आहे.
डोळे आल्यानंतर काय काळजी घ्याल ?
लक्षणे दिसताच शाळेत किंवा कामावर जाणे बंद करावे. स्वतःच्या वस्तू उदा. टॉवेल, रुमाल, उशी आदी दुसयाला वापरायला देऊ नये, घरच्या व्यक्तीच्या थेट संपर्कात येणे टाळावे. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे, सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे, डोळ्यांना आणि चेहऱ्याला स्पर्श करणे टाळावे, प्रोटेक्टिव्ह गॉगल लावावा, स्वतःहून काही उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावा.
सध्या जामखेड तालुक्यासह ग्रामीण भागात डोळ्यांची साथ पसरली आहे. मागील तीन दिवसात २०० च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही बाब सामान्य आहे. डोळे थंड पाण्याने धुवावे, कुटुंबातील व्यक्तींनी रुमाल, टॉवेल स्वतंत्र वापरावा.
-हनुमंत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, जामखेड


0 टिप्पण्या