प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558
गोंदिया -मा.पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, मा.उपविभागीय पोलिस अधिकारी श्री प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखाल
आज रोजी तिरोडा पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणे बाबत विशेष मोहीम राबवण्यात आली, त्यामध्ये अवैध हातभट्टी दारू गाळणारे एकूण 5 इसमांवर कारवाई करण्यात आली. तसेच महाराष्ट्र जुगार कायदा 12 a अन्वये एका इसमावर सट्टापट्टीची कारवाई करण्यात आली.
1. आशा राजेंद्र भोंडेकर राहणार संत रविदास वार्ड हिचे कडून 400 किलो मोहसळवा किंमत 40,000/-
2. अखिल रहीम खान पठाण राहणार संत रविदास वार्ड याचे कडून हातभट्टी चे साहित्य व मोहसळवा असा एकूण 1,06450/-
3. जयश्री सोविंदा बरेकर राहणार सिल्ली हिचेेकडून मोह सडवा व हातभट्टी दारू असा एकूण 12,100/-
4 गोपी भैया लाल कुंबरे राहणार काचे वाणी याचे कडून एकूण 1,71,550 /- रुपये चे हातभट्टी चे साहित्य व मोहसळवा
5. किरण राजेंद्र भालाधरे राहणार आंबेडकर वार्ड तिरोडा याचे कडून हातभट्टीचे साहित्य व मोहसळवा किंमत रुपये 2,60,300/- चा जप्त करण्यात आला.
6. नयन सुनील नागरिकर राहणार भूतनाथ वार्ड याचे सट्टापट्टीचे धंद्यावर रेड करून त्याचे ताब्यातून सट्टापट्टीचे साहित्य व सटापट्टी घेऊन मिळवलेले पैसे असे एकूण 805 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदर कारवाई मध्ये एकूण 5,90,400,/- रुपयांची हातभट्टी दारू व मोहसळवा व भट्टीचे साहित्य हे जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले आहेत तसेच सट्टा पट्टी चे कारवाई मध्ये एकूण 805 रुपये रोख व सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक देवीदास कठाळे, सहायक पोलीस निरिक्षक अभिजित जोगदंड, महिला पोलिस फौजदार राधा लाटे, पोलीस हवालदार बावणे, तिरपुडे, पोलीस शिपाई शिवराज शेंडे, अविनाश लोंढे, सौरभ देवगडे, डहारे, महिला पोलिस शिपाई अभिलाषा वाल्दे यांनी केली.


0 टिप्पण्या