Ticker

6/recent/ticker-posts

जीवन प्रयाग फाऊंडेशन तर्फे डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-जीवन प्रयाग फाऊंडेशन, उदगीरच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चिमुकल्या बालमित्रांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संस्कार, सामाजिक जाणीव आणि महापुरुषांविषयी आदरभाव यांची बीजे बालपणापासूनच रुजावीत, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू होता. या चिमुकल्यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला."  यावेळी जीवन प्रयाग फाऊंडेशनचे उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत सूर्यवंशी, श्री. दयानंद कांबळे, श्री. विजयानंद, कांबळे, सौ. चंद्रकलाबाई सूर्यवंशी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या