कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- अमृत महोत्सवी सांगता वर्षातील स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन दिघोरीकर ग्रामवासी जनतेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद इटवले, सार्वजनिक गांधी चौकात सैनिक धर्मेंद्र शहारे, पोलिस पाटील अजय खोब्रागडे, तर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच शरद इटवले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बँड चे गजरात शालेय विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. राष्ट्रगीत व महापुरुषांच्या जयघोषाने देशप्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपसरपंच संध्या कुळमते, ग्रामपंचायत सदस्य तुलसीदास हलमारे, आशिष खोब्रागडे, धनराज मेश्राम, सदस्या रत्नमाला खोब्रागडे, सरिता शेंडे, नाजूक जांभूळकर, सामाजिक कार्यकर्ते कालिदास खोब्रागडे, पुरुषोत्तम हलमारे, भीमराव देशपांडे, नरेंद्र लांबकाने, इसीनाथ नंदेश्वर, जागेश्र्वर लांबकाने, ग्रामसेवक मंगला येरणे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रुपाली पाखमोडे, मुख्याध्यापक ज्योती राऊत, आरोग्य सेविका नैताम मॅडम, सहाय्यक शिक्षिका ललिता तागडे, निता बोरकर, मिरा वंजारी, अंगणवाडी सेविका लीलावती बडोले, अर्चना हलमारे, मदतनीस शीला हलमारे, आशा कार्यकर्ती प्रभावती कळपते, संगणक परिचालक नीलोफर पठाण, आरोग्य परिचर ललिता बारसागडे, पाणी पुरवठा कर्मचारी राधेश्याम निरगुळे, रोजंदारी कर्मचारी संगम खोब्रागडे, संदीप इटवले यांचेसह गावातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
0 टिप्पण्या