कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षातील ७६वा वर्धापन दिन पोलिस ठाणे लाखनी येथे उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे अध्यक्षतेखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने, आशिष चीलांगे, पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे, देविदास बागडे यांचे प्रमुख उपस्थितीत पोलिस निरीक्षक मिलिंग तायडे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामीने मानवंदना देण्यात आली. यावेळी पोलिस हवालदार सुभाष राठोड, दिगंबर तलमले, गौरीशंकर कडव, सुरेश आत्राम, धनराज भालेराव, निलेश रामटेके, मरसकोल्हे मेजर, महिला पोलिस हवालदार वासंती बोरकर, प्रभा फुलसुंगे, इंद्रायणी येलमुले यांचेसह पोलिस नायक, पोलिस शिपाई, गावातील गणमान्य नागरिक, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिक, सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी व इतर ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 टिप्पण्या